मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अटकेची टांगती तलवार असलेले खासदार उदयनराजे भोसले सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. उद्योजकाकडे खंडणीची मागणी आणि मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नऊ जणांना अटकही झाली होती. दरम्यान, सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं उदयनराजेंना अंतरिम जामीन मंजूर केला.

सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका उद्योगाच्या व्यवस्थापकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले अडचणीत सापडले होते. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दणका देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. हायकोर्टाच्या दणक्यामुळे उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. लोणंद येथे सोना एलाईज नावाचा लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करण्याचा कारखाना असून या कंपनीतील कामगारांचे वेतनवाढीसाठी आंदोलन सुरु आहे. कंपनीत उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे. कंपनीचे व्यवस्थापक जैन यांनी मार्चमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
Independent MLA Prakash Awade, Contest Hatkanangle Lok Sabha Seat , CM Eknath Shinde, Prakash Awade Eknath Shinde meet, eknath shinde shivsena, lok sabha 2024, election 2024, politics news,
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही प्रकाश आवाडे लोकसभा लढण्याचा निर्धार कायम; मंगळवारी अर्ज भरणार
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal with Amit Palekar
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात ईडीच्या रडारवर गोव्यातील आप नेते; कोण आहेत अमित पालेकर?

भोसलेंनी १८ फेब्रुवारी रोजी सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणीची मागणी केली आणि बेदम मारहाण केली अशी तक्रार त्यांनी केली होती. या प्रकरणी उदयनराजे आणि साथीदारांवर मारहाण तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऊ जणांना याप्रकरणात अटकही झाली होती. उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या बुधवारी उच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली होती. न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यापूर्वी सातारा जिल्हा न्यायालयानेही उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आज अखेर उदयनराजे स्वतः सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. त्यांना रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शहरात बंद पाळला.