अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांचे ३८ कोटी १७ लाख ७५ हजार ३२० रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हय़ाचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरच आíथक मदत जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.mh03गेल्या २८ फेब्रुवारी व १ मार्च २०१५ या कालावधीत जिल्हय़ात अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा, काजू यांसह अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषदेच्या संयुक्त पथकाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत वस्तुस्थितीदर्शक पंचनामे तयार केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले फळपिकाखालील बाधित क्षेत्र ३१,८१४.६१ हेक्टर एवढे असून सुमारे ३८ कोटी १७ लाख ७५ हजार ३२० रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच त्या अवकाळी पावसामुळे जिल्हय़ात ८५९ घरांचे अंशत: (रु. ४३,९३,६६९/-) व ३९ गोठय़ांचे अंशत: (रु. ९,८६,४३८/-) आणि अन्य खासगी व सार्वजनक १७ मालमत्तांचे सुमारे ७,६३,२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांना शासनाकडून लवकरच आíथक मदतीचे वाटप करण्यात येईल, असे पालकमंत्री वायकर यांनी सांगितले.