अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण भरल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या लगत सातपूडा पर्वत रांगांवर भरपूर पाऊस झाल्याने काल शुक्रवार रात्रीपासून धरणाच्या पातळीत वाढ होत  होती. तसेच जिल्ह्यातील शहापूर, पूर्णा, चंद्रभागा ही धरणेही ७० टक्के भरली गेल्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्कतेची इशारा देण्यात आला आहे.