दिवसेंदिवस कठीण होत जाणाऱ्या जाॅब मार्केटमध्ये आपलं स्थान मजबूत करायचं असेल तर कामाचा अनुभव हवा.

इंडियन आॅईलमध्ये अनेक जागांसाठी संधी उपलब्ध आहेत. शंभराहून जास्त व्हेकन्सीज् साठी १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायची मुदत आहे.

कंपनीने अॅप्रेंटिसशिपसाठी (कार्यानुभव) अर्ज मागवले आहेत. सध्या इंडियन आॅईलमध्ये टेक्निकल अॅप्रेंटिसशिपसाठी १०७ जागा मोकळ्या आहेत. तर ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी ३ जागा आहेत. या जागांसाठी १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. वेगवेगळ्आ पदांसाठी वेगवेगळ्या किमान योग्यता ठरवण्यात आल्या आहेत. या सर्व जागांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. या पदांसाठी १८ ते २४ वयोगटामधले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवाराचं वय १ डिसेंबर २०१६ ला या वयोगटात असायला हवं. इंडियन आॅईलच्या वेबसाईटवर आणखी माहिती उपलब्ध आहे

 

क्विव इन्फो:

कंपनी : इंडियन आॅईल

पदं – टेक्निकल अॅप्रेंटिसशिप (१०७), ट्रेड अॅप्रेंटिसशिप (३)

किमान योग्यता- उमेदवार १ डिसेंबर २०१६ला  १८ ते २४ वयोगटातला असावा. याशिवाय अर्हता प्रत्येक पदासाठी वेगवेगळी

निवड प्रक्रिया- लेखी परीक्षा आणि व्यक्तिगत मुलाखत

इंडियन आॅईलच्या वेबसाईटवर अधिक माहिती