भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यंदा विधानपरिषदेच्या जळगाव मतदारसंघाची निवडणूक रंगतदार झाली होती. भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही निवडणुकीच्या रिंगणात चंदू पटेल यांच्याविरोधात सात अपक्ष उमेदवार उभे होते. त्यामुळे ‘खडसे फॅक्टर’ चंदू पटेल यांना अपशकून करणार, का याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र, सरतेशेवटी चंदू पटेल यांनी ४२१ मते मिळवत विजय संपादन केला.

[jwplayer gzWvwV1h-1o30kmL6]

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Chief Minister Eknath Shinde praises doctors as angels during the Corona period and criticize uddhav thackera
शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले “डॉक्टर नाही, पण काहींचे पट्टे सोडवले”
Sunita Kejriwal
‘केजरीवालांना आशीर्वाद द्या’; पत्नी सुनीता यांची व्हॉट्स अ‍ॅप मोहीम
BJP Spokesperson Gaurav Bhatia Beaten Video
भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांना वकिलांनी भररस्त्यात चोपलं? लोकांना झाला आनंद, Video मध्ये नेमकं काय घडलं?

या जागेसाठी खडसेंनी सुचविलेल्या विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांना उमेदवारी नाकारत महाजनसमर्थक चंदू पटेल यांना उमेदवारी दिली गेली. पक्षाचा क्रियाशील सदस्य नसलेल्या बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी देऊन भाजपने नवीन पायंडा पाडल्याची टीका खडसेंनी केली. त्यामुळे या निवडणुकीत चंदू पटेल यांना खडसे गटाकडून दगाफटका होऊ नये म्हणून गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचा गट सावध झाला होता. विरोधी पक्षातून प्रबळ उमेदवार समोर आल्यास त्यास नाराज गटाकडून रसद पुरविली जाण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचा उमेदवारच रिंगणात राहणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली होती. काँग्रेस, शिवसेना, खान्देश विकास आघाडीसह १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे रिंगणात भाजप विरोधात सात अपक्ष उमेदवार होते. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही अपक्षांचे ‘समाधान’ न झाल्यामुळे निवडणूक होत आहे. मागील निवडणूक खडसेंनी अविरोध घडवून आणली होती. सर्वाचे मतैक्य घडवत जगवानी विजयी झाले होते. महाजन यांचाही तोच प्रयत्न होता. परंतु, त्यात त्यांना यश मिळणार नाही अशी खेळी अपक्षांच्या मदतीने खेळली गेली. त्यामागे नाराज खडसे गट असल्याचे सांगितले जाते. यावेळी जिल्ह्य़ातील १३ नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांच्या खर्चाची बेगमी करण्याकडे रोख होता. आर्थिक दृष्टीने सक्षम उमेदवाराला रिंगणात उतरवत भाजपने कुठे कमी पडणार नाही याची दक्षता घेतली. उमेदवार निवड प्रक्रियेवर खडसेंनी बोट ठेवल्याने ही निवडणूक गांभीर्याने घेऊन महाजन गटाने सर्व आघाडय़ांवर व्यूहरचना करण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

[jwplayer WH6ZUMPe-1o30kmL6]