चोर सोडून संन्याशाला फाशीचा अनुभव सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना येत आहे. गस्तीसाठी फिरणा-या ग्रामस्थांकडून कामासाठी, जेवणासाठी नातेवाइकांकडे जाणा-यांना चोप दिल्याचे प्रकार घडत आहेत. करवीर तालुक्यातील आंबेवाडी, हळदी या ठिकाणी तब्बल ११ जणांना चोर समजून नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. यातील ५ जणांनी गस्त घालणा-यांच्या भीतीने रात्र जंगलात काढली.
यामुळे गस्त घालणा-या नागरिकांच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली जात आहे. कागल येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात काम करणारे पाच परप्रांतीय मजूर बस चुकल्याने आंबेवाडीतून मंगळवारी सकाळच्या सुमारास निघाले होते. गस्त घालणा-या ग्रामस्थांच्या जमावाने चोर समजून या पाचही जणांना बेदम चोप दिला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी पोलीस गाडीवरही दगडफेक केली. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी संयमाने परिस्थिती हाताळत नियंत्रणाखाली आणली. यानंतर पोलिसांनी बबलीप्रसाद मथुराप्रसाद चौधरी (वय २५), रामनारायणप्रसाद ब्रीजवाशी चौधरी (वय ३४), प्रमोदकुमार मीश्राराम रावत (वय ३२), हितुकुमार राजबिहार चौधरी (वय २५, रा. सर्व.लालगांव जि.रिवा राज्य. मध्यप्रदेश), कमलेशप्रसाद छोटेलाल चौधरी (वय २२, रा. लोहारी मध्य प्रदेश) यांची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली. पाचही जणांकडे चौकशी केली असता आपण कागल येथील महालक्ष्मी दूध संस्थेत कामास असून बस चुकल्याने चालत निघाल्याचे सांगितले. पोलिसांनी ठेकेदार राजकुमार चौधरी याला बोलावून याची खातरजमा करून पाचही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
दरम्यान शिरढोण (ता. शिरोळ) येथील पाच जण देवाळे येथील मित्राकडून जेऊन परतत असताना हळदी येथे गस्त घालणाऱ्या नागरिकांच्या हातातील बंदूक, काठय़ा, तलवारी बघून माघारी परतणाऱ्या पाच जणांना जंगलात रात्र काढावी लागली. संजय लक्ष्मण कदम (वय ३२), श्रेणीक जिन्नाप्पा उपाध्ये (वय ४५, रा. इंगळी ता. हातकणंगले), आण्णाप्पा उर्फ मंगेश बबन भंडारे (वय ४९), प्रकाश शंकर कांबळे, आदम खुदबुद्दीन मुजारव (वय ४३), हे मंगळवारी रात्री देवाळे येथील आपले मित्र संभाजी शामराव खाडे यांच्याकडे जेवायला गेले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेवण करून परतत असताना हळदी येथे गस्त घालणाऱ्या नागरिकांचा जमाव पाहून घाबरून ते देवाळे कडे परत निघाले. गस्त घालणाऱ्या नागरिकांना हे पाचही जण चोर असल्याचा संशय आल्याने त्यांनी पाचही जणांचा पाठलाग सुरू केला. या पाचही जणांनी मोटारसायलक सोडून जंगलात पलायन केले. पहाटे संभाजी खाडे यांच्याशी मोबाईवरून संपर्क साधून त्यांना हळदीत येण्यास सांगितले. पाचही जण जंगलातून हळदीत आले असता संभाजी खाडे यांच्याशी त्यांची भेट झाली. दरम्यान ग्रामस्थांना रात्री पसार झालेले चोरटे पुन्हा आल्याचा संशय आल्याने या सहाही जणांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती