लातूर येथे विवेकानंद रुग्णालयात लवकरच कर्करोग विभाग सुरू होणार आहे. या विभागाचे कामकाजही पूर्ण होत आले असून ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग प्रतिबंध दिनानिमित्त मौखिक कर्करोग निदान शिबिराचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती डॉ. अशोक कुकडे, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. प्रमोद टिके, डॉ. निखिल घडय़ाळ पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या ५० वर्षांपासून विवेकानंद रुग्णालय शहरात सुरू आहे.
कर्करोग रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे व त्यावर उपचार केंद्रे तुलनेने कमी आहेत. रेडियशन उपचार पद्धती मराठवाडय़ात औरंगाबादखेरीज अन्य कुठेही नाही. रुग्णांची ही गरसोय लक्षात घेऊन विवेकानंद रुग्णालयाने विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल हा नवीन विभाग एमआयडीसी भागात उभा केला असून त्यासाठी १५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या रुग्णालयात कर्करोग शस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ. ब्रिजमोहन झंवर, कर्करोग रेडियशन विशेषज्ञ डॉ. प्रमोद टिके, केमोथेरपी विशेषज्ञ डॉ. निखिल घडय़ाळ पाटील हे नियमितपणे आपली सेवा देणार आहेत.
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा नागावकर या काम पाहणार असून रुग्णालयाची सुरक्षा संजय संकद व तंत्रज्ञ अरुण ढोरे पाहणार आहेत. मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमधून भाभाट्रॉन २ हे आधुनिक रेडियशन उपकरण रुग्णालयात दाखल झाले आहे. लातुरात आता कॅन्सरसंबंधी सर्व प्रकारचे अद्ययावत उपचार विवेकानंद रुग्णालयात होत असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले.
३० टक्के खर्चात लातुरात उपचार
कर्करोग रुग्णावर मोठय़ा शहरात उपचार करण्यासाठी दीर्घकाळ रहावे लागते व त्यासाठी मोठा खर्च सहन करावा लागतो. विवेकानंद रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अन्य शहराच्या तुलनेत ३० टक्के इतक्या कमी खर्चात उपचार उपलब्ध होणार असल्याचे डॉ. अशोक कुकडे यांनी सांगितले.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही
‘आयसर’च्या प्रवेष परीक्षेची तारीख जाहीर; अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू