दररोज लाखो लिटर पाणी जातंय खाडीला

राज्यातील अनेक गावे सध्या दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. पेण तालुक्यातील खारेपाट परिसरही याला अपवाद नाही.  घोटभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ पेण तालुक्यातील २२ गावांमधील जनतेवर आली आहे, मात्र रायगड जिल्हय़ात मात्र हेटवणे धरणातील लाखो लिटर पाणी दररोज वाहून वाया जात आहे.

water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Nighoje bandhara Leakage Leads to Water Shortage in Pimpri
पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न
water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा

पेण तालुक्यातील जनतेचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी जलसंपदा विभागातर्फे हेटवणे धरण १९९५ साली बांधण्यात आलं. मात्र या धरणाचं पाणी पेणमधील नागरिकांना मिळतच नाही. ते जातंय नवी मुंबईला. पेण परिसरातील काही भागांत शेतीला कालव्यांतून पाणी सोडलं जातं; परंतु पेण तालुक्यातील अंतोरा बंदराजवळ असलेल्या बंधाऱ्यांतून दररोज यातील लाखो लिटर पाणी चक्क धरमतर खाडीला जाऊन मिळते आहे नवी मुंबई व इतरत्र पाणी पुरवूनही धरणात १४७ क्यूबिक घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक राहतो; परंतु खारेपाटवासीयांची पाण्यासाठीची तडफड पाहून सरकारला पाझर फुटला नाही. या भागासाठी रायगड जिल्हा परिषद, जीवन प्राधिकरण यांनी पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना राबविल्या. या भागात फिरताना गावागावांत पाण्याच्या साठवण टाक्या पाहायला मिळतात, परंतु अनेक वर्षांत या टाक्यांमध्ये पाण्याचा थेंब पडला नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे  ग्रामस्थांची वणवण सुरू आहे. २०० लिटर पाण्याच्या ड्रमसाठी २५० रुपये मोजावे लागत आहेत. विकतचे पाणी घेताना ग्रामस्थांचा घसा सुकलाय. दुसरीकडे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे.   पेणच्या पाणी प्रश्नावर अनेकदा बठका झाल्या. त्यावर केवळ राजकारण सुरू आहे. हा प्रश्न सुटावा असे कधीच कुणाला वाटले नाही. रायगडचे प्रभावी नेतृत्व असलेल्या सुनील तटकरेंकडे जलसंपदा खातं होतं तेव्हादेखील या प्रश्नाची तड लागली नाही. आता राज्यात सत्तेत असलेली शिवसेनादेखील या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व ही गंभीर बाब त्यांच्या कानावर घातली. हे प्रकरण लवकरच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत नेणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले.

पाण्यावरून राज्यात रणकंदन माजलंय. अनेक ठिकाणी १४४ कलम लागू झालंय. जनता घोटभर पाण्यासाठी आक्रोश करतेय. असं असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेणमध्ये दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होतेय, त्याकडे कुणाचं लक्ष जाणार आहे की नाही, हाच खरा सवाल आहे.