भुईज पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने भुईज परिसरात शनिवारी पहाटे टाकलेल्या संयुक्त छाप्यात पिस्तुल,तलवारी गुप्त्या, जांभ्या असा मोठा शस्त्र साठा जप्त केला.या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईबाबत वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबंरे यांनी सांगितले की, भुईज पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली की, भुईज परिसरात काही लोकांकडे शस्त्रसाठा आहे.त्याप्रमाणे बंटी उर्फ अनिकेत नारायण जाधव याच्याकडे चौकशी केली आणि त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन तलवारी मिळून आल्या. यानंतर वरुण समरसिंग जाधव याच्याकडे एक पिस्तुल आणि दोन तलवारी सापडल्या. यानंतर या दोघांचे सहकारी अतुल सखाराम जाधव रा. विराटनगर पाचवड याच्याकडे दोन तलवारी आणि एक पिस्तूल आढळून आले व केतन हणमंत धुमाळ रा. वीर ता. पुरंदर. सध्या रा. भुईज याच्याकडे तीन तलवारी, अकरा गुप्त्या आणि पाच जांभिया असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.बंटी जाधव आणि वरुण जाधव याच्याकडील पिस्तुल हे छऱ्याचे पिस्तूल आसल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सर्वाना अटक करण्यात आली आहे. यांनी आणखी कोणाकडे शस्त्र ठेवली आहेत आणि कोणाकडून आणली याबाबत माहिती मिळविण्याचे काम सुरु आहे . भुईज परिसरात आणखीही शस्त्रसाठा मिळण्याची शक्यता असल्याचे दीपक हुंबंरे यांनी सांगितले. या सर्वावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कारवाईत भुईजचे सपोनि नारायण पवार ,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे विकास जाधव,मेढा पोलीस ठाण्याचे समाधान चवरे, कुडाळचे उपनिरीक्षक टकलेंसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?