छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पश्चिम घाट हा गनिमी युद्धासाठी अनुकूल परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नक्षलवाद्यांनी आपले नवे कार्यक्षेत्र सह्य़ाद्रीच्या रांगांमध्ये निश्चित केल्याचे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.
गनिमी काव्याच्या युद्धात नक्षलवादी अगदी प्रवीण आहेत. त्यामुळे त्यांनी इतिहासावर नजर ठेवत हा निर्णय जाहीर केला, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. या चळवळीने पश्चिम घाटात नवे प्रभावक्षेत्र विकसित केले तर आजवर केवळ मध्य भारतातील जंगलावर लक्ष केंद्रित केलेल्या सुरक्षा दलांसमोरील आव्हानही वाढणार आहे. गेल्या मे महिन्यात पक्षात विलीन झालेला केरळमधील सीपीआय नक्षलवादी पक्ष या युद्धात चळवळीसोबत सक्रिय राहणार आहे, असे नक्षलवाद्यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू व महाराष्ट्रात शिरकाव केलेल्या नक्षलवाद्यांना केरळमध्येही साथ मिळाली आहे. त्यामुळे या चार राज्यांच्या पश्चिम घाट क्षेत्रात हिंसक कारवाई सुरू करणे साधणार आहे.
गेल्या दहा वर्षांत सुरक्षादलांशी सुरू असलेल्या हिंसाचारात २ हजार ३३२ नक्षलवादी मारले गेले. लोकसभा निवडणुकीच्या काळात ६३ जवानांना ठार करण्यात चळवळीला यश आले व आता चळवळीत महिलांचा सहभाग ४० टक्क्यांवर गेला आहे, असे केंद्रीय समितीने या पत्रात म्हटले आहे.