पश्चिम रेल्‍वेच्‍या उधना-जळगाव दरम्‍यान सुरु असलेल्‍या रेल्‍वे मार्ग तपासणी आणि दुहेरीकरण मार्ग चाचणी या कामासाठी तीनपैकी दोन सुरत-भुसावळ पॅसेंजर आणि सुरत-अमरावती इंटरसिटी एक्‍सप्रेस २ ऑक्‍टोबरपर्यत रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. या कालावधीत रद्द करण्‍यात आलेल्‍या तीनपैकी एक सुरत-भुसावळ पॅसेंजर नंदूरबार पर्यंतच धावणार आहे.

रेल्‍वे सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दोंडाईचा ते होळ दरम्‍यानच्‍या रेल्‍वे मार्गाच्‍या दुहेरीकरण आणि तांत्रिक तपासणी चाचणीसाठी भुसावळ-सुरत दरम्‍यान धावणाऱ्या तीन पॅसेंजर गाडया आणि अमरावती-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस गाडया रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. या कालावधीमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पाच जलद गाडयांना तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात विविध स्‍थानकांवर थांबा देण्‍यात येणार आहे.

Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
best recovered rs 40 lakhs as fine from ticketless travelers
मुंबई: बेस्ट बसमधील ६४ हजार फुकट्या प्रवाशांची धरपकड; ४० लाख रुपये दंड वसूल
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

५९०१३ सुरत-भुसावळ पॅसेंजर व ५९०७७ सुरत-भुसावळ पॅसेंजर या गाड्या १ ऑक्‍टोबरपर्यंत, ५९०१४ भुसावळ-सुरत पॅसेंजर व ५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजर २ ऑक्‍टोबरपर्यंत, १९०२५ सुरत अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेस १ ऑक्‍टोबरपर्यंत, तर १९०२६ अमरावती सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस २ ऑक्‍टोबर पर्यंत रद्द करण्‍यात आली आहे. तर ५९०७५ / ५९०७६ भुसावळ-सुरत- भुसावळ पॅसेंजर गाडी सुरत ते नंदुरबार दरम्‍यान धावणार आहे.
दसरा पर्व आणि नवरात्रीच्‍या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस, ओखा-पुरी एक्स्प्रेस, पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस, यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस, पोरबंदर-सांतरागाची कवी गुरु एक्स्प्रेस या पाच गाड्यांना बारडोली, व्‍यारा, अमळनेर आणि धरणगांव येथे थांबा देण्‍यात येणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या-
५९०१३ आणि ५९०७७ सुरत-भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या २५ सप्‍टेबर ते १ ऑक्‍टोबर पर्यंत रद्द
५९०१४ आणि ५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजर या दोन गाड्या २६ सप्‍टेंबर ते २ ऑक्‍टोबर पर्यंत रद्द
१९०२५ सुरत-अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेस २४ सप्‍टेंबर ते १ ऑक्‍टोबर पर्यंत रद्द
१९०२६ अमरावती सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस २५ सप्‍टेंबर ते २ ऑक्‍टोबर पर्यंत रद्द

या गाड्या धावणार
५९०७५ सुरत-भुसावळ पॅसेंजर दि.१ ऑक्‍टोबरपर्यंत सुरत- नंदुरबार अशी धावणार
५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर २ ऑक्‍टोबरपर्यंत नंदुरबार-सुरत अशी धावणार