मुरुड-जंजिरा पर्यटनात प्रसिद्ध अशा फणसाड अभयारण्यामध्ये  बौद्धपौर्णिमा दिनी वन्य प्राणी, पक्षी गणना दिन वनक्षेत्रपाल एस. आय. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. वन्य प्राण, पक्षी गणना दिनानिमित्ताने फणसाड अभयारण्यातील पाण्याचा व प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी सावरई तलाव, फणसाड गाण बांध तलाव चिखलगाण, घुण्याचा माळ, भांडवाचा माळ, व्हल्चर (गिधार) रेस्टॉरंट, डुक्कर गाण, करंजगाण, हेळगाण, केळेगाण, केतकीची गाण, आदी २७ गाणींवर वन्यप्रणी-पक्षी गणनेसाठी निसर्गप्रेमीकरिता ६ मचाणी वॉच टॉवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे येथून ४० निसर्गप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते. निसर्गप्रेमींनी मचाणावर ग्रुप-ग्रुपने अभयारण्यातील वन्यप्राणी-पक्षी गणना केली. यामध्ये फणसाड अभयारण्य टीमचे सहकार्य लाभले.

यामध्ये फणसाड अभयारण्यात बिबटय़ा, सांबर, भेकर, रानडुक्कर, सािळदर, पिसोरा, टिटवी, धनेश रातवा, घुबड, गरुड, स्वर्गीय नर्तक, शेकरु, तांबट, कोतवाल, आदी वन्य प्राणी, पक्षी, निसर्गप्रेमींना व्याघ्र प्रगणा वेळेस आढळून आले. सर्व निसर्गप्रेमी व अभयारण्य टीमने उत्साहाने निसर्ग सान्निध्यात पक्षी-प्राण्यांचा गणनेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.