राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा सगळ्यांसाठी सारखा असून वेळ पडल्यास त्यांना अटक करण्यात येईल असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे. खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली उदयनराजे यांच्यावर सोना अलाईन कंपनीच्या मालकाने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच उदयनराजे भोसले यांना अटकपूर्व जामीन अर्जही अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात ९ आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. तसंच खासदार उदयनराजेंचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास  सुरू आहे. गरज पडल्यास खासदारांवरही कारवाई होईल असंही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साताऱ्यातल्या लोणंदमधे सोना अलाईज नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत उदयराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्त्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते असा आरोप उदयनराजे यांनी केला.

त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी उदयनराजे यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना साताऱ्यातल्या विश्रामगृहात बोलावून घेतले. ज्यानंतर जैन यांना उदयनराजे भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. तसंच काही ऐवज काढून घेतला. यानंतर झालेल्या तक्रारीनंतर उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणात नेमके काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will arrest udayanraje if require says nangre patil
First published on: 07-06-2017 at 19:08 IST