रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा कळस

आदिवासी समाजातील अवघडलेली महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात येते. मात्र तिला प्रवेश दिला जात नाही. सहा तास ती कण्हत-कण्हत रुग्णालयाच्या दारातच बसते. अखेर सहा तासाने ती तिथेच प्रसूत होते! त्यानंतरही तिला रुग्णालयात घेण्याऐवजी प्रसूत झालेली जागा साफ करण्याचे फर्मान सोडून स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाने गुरुवारी दुपारी असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचे दाखवून दिले. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या काही संवेदनशील नागरिकांनी मात्र संताप व्यक्त करून जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. या संतापजनक प्रकारामुळे तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उस्मानाबादेत उमटू लागल्या आहेत.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथून जवळच असलेल्या गोपाळवाडी पारधी वस्ती येथील सपना अनिल पवार ही गर्भवती महिला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्त्री रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली. परंतु तिला दाखल करून घेण्यात आले नाही. अवघडलेली ही महिला तशीच पायऱ्यांवर बसून होती. तिच्याकडे प्रशासनाने जराही लक्ष दिले नाही. तीन वाजण्याच्या सुमारास ही महिला चक्क पायरीवरच प्रसूत झाली. एवढेच नाही तर अशा परिस्थितीमध्ये या महिलेलाच ती जागा साफ करण्यास सांगितल्याने उपस्थित असलेल्या लोकांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. नातेवाईकांनी आरडाओरड केली. याचेच कारण प्रशासनाने पुढे करत नातेवाईकच कसे दोषी आहेत, याचा पाढा वाचायला सुरुवात केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आदिवासी समाजाच्या महिलेवर अशी वेळ आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ मागील महिन्यात राज्यभर तीव्र आंदोलन केले. त्यानंतर संरक्षणासह काही मागण्याही पदरात पाडून घेतल्या. याला एक महिना होतो न होतो तोवर उस्मानाबादमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

प्रसूतीनंतर मदतीचा दिखावा

सकाळपासून आम्ही आमच्या रुग्णाला दाखल करण्यासाठी विनंती करत होतो. मात्र, यांनी कोणीही आमची दखल घेतली नाही, उलट फुकट डिलीव्हरी होत नसते म्हणून आमच्याकडे पशाची मागणी केली. पण येताना मोजकेच पसे घेऊन आल्याने आमच्याकडे काहीच पसे नव्हते. तरीही आमची गरज होती, म्हणून आम्ही आतमध्ये घेतील या आशेवर थांबलो होतो. शेवटपर्यंत आम्हाला आत काही घेतले नाही. या सगळ्यातून ही महिला व तिचे बाळ सुखरूप राहिल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर डॉक्टर पुढे आले असता, बाळासह महिला व तिचे नातेवाईक रिक्षातून दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी निघून गेले.