दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे कार्य नव्या पिढीला समजण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने मोठे कार्य साधले आहे. या प्रतिष्ठानमध्येच योगदान देत मोहनराव डकरे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जपणूक केल्याने त्यांचे या विश्वस्त संस्थेशी अतूट नाते निर्माण झाल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितेले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव मोहनराव कृष्णाजी डकरे यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा व ‘पारिजात’ या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सुळे यांच्या हस्ते झाले.
त्या वेळी त्या बोलत होत्या. आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, केदारनाथ महाराज, आमदार जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा संगीता देसाई उपस्थित होते. आवाडे म्हणाले, की यशवंतराव चव्हाणांचे विचार, आदर्श संस्कृती व कर्तृत्व कृतीतून चिरंतन ठेवण्यासाठी मोहनराव डकरे यांची सतत तळमळ राहिली. यशवंतराव चव्हाण यांचा वेणूताईंशी झालेला पत्रव्यवहार अन् भेटवस्तूंचे संगोपन त्यांनी केले.
वेणूताई चव्हाण ट्रस्टचे काम जिद्दीने पुढे नेले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांचे विचार
डकरे यांनी जपले. मोहनराव डकरे म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांच्या परीस्पर्शाने माझ्या जीवनाचे सोने झाले.