आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी तरी भीष्मासारखा शरपंजरी पडलेला असतो. फक्त भीष्मांना वेधून टाकणारे शर दिसू शकत होते. आपल्या हृदयाला लागणारे शर अदृश्य असतात. वेदना ठसठशीत असते. डोळे भरून आलेले असतात; पण ती वेदना आणि तिची बोच अनुभव घेणाऱ्यालाच कळते. ‘त्यात काय एवढं’ असं इतरांना म्हणणं सोपं असतं.. पण ‘हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दु:ख ठावे’.

‘‘अरे, किती छान चाललं होतं दोघांचं. किती सुंदर दिसायचा लक्ष्मी-नारायणाचा जोडा, अगदी राजा-राणीचा संसार चालला होता. नवीन मोठं घर घेतलं होतं, नवीन गाडी घेतली होती. दोघांना उत्तम नोकऱ्या होत्या.. आणि हे काय आता.. वेगळं होतायत दोघे जण? कमाल आहे! सगळी सुखं दाराशी हात जोडून उभी आहेत. कशाला काही कमी नाही.. सगळं मिळतंय ना सुख, मग लाथाडायचं..’’ शेजारच्या काकू त्यांच्या कुटुंबातल्या कुणाच्या तरी घटस्फोटावरून चिडल्या होत्या.

How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

घरासमोरच्या झाडांना पाणी घालताना ऐकू येत होतं काकूंचं बोलणं. इतक्यात समोर राहणाऱ्या आयुषीनं अतिशय सुंदर चपला कचऱ्याच्या डब्यात आणून टाकल्या. किती सुंदर होत्या त्या चपला. छान छोटे छोटे खडे लावले होते अंगठय़ाला. उंच टाचा होत्या. पाऊल झाकणाऱ्या भागावरही चमकदार दोऱ्यांनी सुंदर नक्षीकाम केलं होतं आणि मुख्य म्हणजे आयुषीच्या नाजूक पायाला फार छान दिसायच्या. मी म्हटलं, ‘‘का गं? इतक्या सुंदर चपला टाकून का देतेयस?’’ मला म्हणाली, ‘‘अगं, त्याच्यातला एक खिळा इतका टोचतोय, बघ ना काल जखम झाली पायाला..’’ तिचं बोलणं ऐकून वीज चमकल्यासारखा एक विचार चमकून गेला मनात.. ‘चपलेतला खिळा’. काकूंचं ते बोलणं आणि आयुषीचं चप्पल टाकून देणं.. उगाचच काही तरी संबंध वाटायला लागला. बाहेरून सुंदर दिसणाऱ्या चपलेतला खिळा बाहेरून बघणाऱ्याला दिसत नाही, पण चप्पल घालणाऱ्याला बरोब्बर बोचतो. त्याची वेदना फक्त त्याची त्यालाच कळते.. तसाच बाहेरून सुंदर, सुखी, गोंडस, गोजिरवाणा दिसणारा त्या दोघांचा संसार.. पण त्यातला नेमका खिळा काय आहे आणि तो कुठे टोचतोय हे त्या दोघांनाच माहीत.. त्याची वेदनाही फक्त त्या दोघांनाच ठाऊक! पण दुरून बघणारे आपण मात्र लगेच ताशेरे ओढायला सुरुवात करतो.

एखाद्याला पोहायला शिकवताना नाही का आपण काठावर उभं राहून, ‘अरे, असा हात मार, असा पाय उचल’ अशा सहज सूचना देत राहतो आणि त्यानं नाही केलं तसं की, ‘मूर्ख आहे लेकाचा.. इतकं साधं जमत नाही’ असा काठावरूनच त्याचा उद्धार करतो आपण, पण नाकातोंडात पाणी त्याच्या जात असतं, गटांगळ्या तो खात असतो. बाहेरून बघायला नि बोलायला सगळंच सोपं असतं. पोहायला शिकणाऱ्याचं सोडून द्या. आपली मजल तर विराट किंवा सचिनलाही ‘खेळता येत नसतील असले बॉल तर सोडून द्या क्रिकेट..’ असं सांगण्यापर्यंत जाते, कारण टीव्हीतून  एवढंसं मैदान दिसतं.. एवढीशी खेळपट्टी.. स्टम्पला अगदी लागून उभा आहे यष्टिरक्षक असं वाटतं.. बरं, आपण प्रत्यक्षात मैदानात उतरणार नसतो, प्रत्येक गोष्टीत आपल्याला मत असतं, घटनेनं भाषणस्वातंत्र्य दिलेलं असतं आणि आपण चुकतच नाही असा आपला विश्वास असतो. मग विधानं करायला काय हरकत आहे? गंमत आहे ना! आपण चुकत नाहीच. चुकतो नेहमी दुसराच. पायरी चुकते, गाडी चुकते, नेम चुकतो.. आपण उतरताना लक्ष दिलं नाही तरी चूक पायरीचीच.. आपण वेळेत स्टेशनवर पोहोचलो नाही तरी चूक गाडीचीच.. गमतीशीर स्वभाव आहे आपला! एका महान तत्त्ववेत्त्याची ती गोष्ट किती बोलकी आहे.. ‘दोषी स्त्रीला त्यानेच दगड मारावेत ज्याने आजपर्यंत एकही पाप केलं नाही..’ इतरांना चपलेतला खिळा नेमका कुठे टोचतोय हे जाणून न घेताच ताशेरे ओढणाऱ्या आपल्याला अंतर्मुख करायला असा तत्त्ववेत्ता यायला हवा. भवभूतीच्या ‘उत्तर रामचरितम्’ नाटकात भवभूतीने फार सुंदर वाक्य लिहिलंय. राजा होणं हे लोकांना आनंदादायी वाटतं, पण ‘कष्टोजन: कुलजनै: अनुरंजनीय:।’ लोकांचं, प्रजेचं रंजन करणं हे कठीण काम आहे. नवरत्नांचा मुकुट डोईवर असला तरी त्याचं वजन, त्याची प्रतिष्ठा, त्याचं टोचणं हे सगळं त्या राजालाच सहन करावं लागतं. सिंहासनाच्या मऊ  गादीखाली आपल्याला न दिसणारे, पण राजाला बोचणारे खिळे असतातच आणि डोक्यावर असते आपल्याला न दिसणारी, टांगती तलवार!

आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी तरी भीष्मासारखा शरपंजरी पडलेला असतो. फक्त भीष्मांना वेधून टाकणारे शर दिसू शकत होते. आपल्या हृदयाला लागणारे शर अदृश्य असतात. वेदना ठसठशीत असते. डोळे भरून आलेले असतात; पण ती वेदना आणि तिची बोच अनुभव घेणाऱ्यालाच कळते. ‘त्यात काय एवढं’ असं इतरांना म्हणणं सोपं असतं.. पण ‘हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दु:ख ठावे’.

वेदनेचा एक अर्थ जाणीवही आहे. त्यामुळे एखाद्याची वेदना आपल्याला कळली नाही तरी संवेदनशीलतेने त्या वेदनेकडे पाहायला काय हरकत आहे? किमान काही क्षण तरी त्याच्या जागी स्वत:ला कल्पून बघायला काय हरकत आहे. इंग्रजीतली म्हण म्हणूनच तयार झाली असावी- ‘टू पुट वनसेल्फ इन समवन्स् शूज’. चपलेत पाय घातल्याखेरीज नेमकी बोच कळत नाही. माऊली म्हणतात तसं- ‘‘माणूस जात्या वाईट नसतो. परिस्थिती त्याला तसं बनवते.’’ ही परिस्थिती म्हणजेच चपलेतला खिळा का? प्रत्येक वेळा दुसऱ्याच्या बाबतीतली परिस्थिती बदलणं आपल्याला शक्य नाही, पण बोरकर म्हणतात तसं, ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दु:खे डोळा पाणी..’ हे तर होऊ शकतं ना.. हे जमणं म्हणजेच सहानुभूती.. आपण सहानुभूती म्हणजे कणव असा सोपा आणि आपल्या सोयीचा अर्थ घेतला.. सहानुभूती दाखवायची नसते.. ती घ्यायची असते.. अनुभूती आहे ना ती, म्हणजे ती बोच आपल्याला कळते.

संत उपदेश करतात आणि तो आपल्याला पटतो, कारण ते काठावरून उपदेश करत नाहीत, तर ती अनुभूती ते घेतात.. अगदी आपल्यासारखे ते संसारात अडकून अनुभूती घेत नसतील.. पण किमान त्या पातळीवर ते विचार करतात.. आणि मगच सांगतात.. तुकाराम महाराजांची गुळाची गोष्ट आठवली. एक बाई आपल्या मुलाला घेऊन महाराजांकडे आली, म्हणाली, ‘‘आता तुम्हीच सांगा याला, रोज सारखा सारखा गूळ खातो. सांगून ऐकत नाही..’’ महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही याला आठ दिवसांनी घेऊन या. मग सांगेन मी याला.’’ बाईला कळेना नुसतं सांगायला आठ दिवस कशाला? पण काही बोलली नाही आणि आठ दिवसांनी आली परत. या वेळी तुकाराम महाराजांनी त्या मुलाला अगदी गोड भाषेत गूळ जास्त न खाण्याबद्दल सांगितलं.. बाईने विचारलं, ‘‘हे त्याच दिवशी का नाही सांगितलं?’’ महाराज म्हणाले, ‘‘अगं, गूळ मीही रोज खात होतो, मलाही खूप आवडतो गूळ. त्याला गूळ कमी खा सांगणार कुठल्या तोंडाने? म्हणून मी आठ दिवस माझ्या गूळ खाण्यावर ताबा ठेवला आणि आता कसं मी त्याला ठामपणे सांगू शकतो. आवडीचा पदार्थ खाताना ताबा ठेवताना काय त्रास होतो हे आधी मी नको का अनुभवायला?’’ ही खरी सहानुभूती..

योग्य-अयोग्य, चूक-बरोबर असं ठरलेलं काही नसतं. ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. रणछोडदास असं बिरुद मिरवणाऱ्या कृष्णाने अर्जुनाला मात्र रण सोडू दिलं नाही.. रण सोडणं कृष्णाच्या बाबतीत योग्य असलं तरी प्राप्त परिस्थितीत ते अर्जुनासाठी योग्य नव्हतं.. असो, या सगळ्या पिंजलेल्या विचार कापसाचा धागा वळला तर तो धागा. ते सूत्र एवढंच असेल..

ना कर हमे तू रुसवा (बदनाम)

बगैर जाने हालात-ए-दिल

बरसे है हमपर संग (दगड) हमेशा

तब बना है शीश महल.

अर्थात.. एका खिळ्यामुळे चांगली चप्पल टाकून देण्याआधी तो खिळा काढता येतो का याचा प्रयत्नही करून बघायला हवा. नाही का?

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com