मि.परफेक्शनिस्ट आमिर खानपासून ते सध्याचे युवा कलाकार सुशांत सिंग राजपूत, परिणीती चोप्रा आणि काही बॉलीवूड कलाकारांनी काश्मीर, आसाम आणि विशाखापट्टणम पूरग्रस्तांकरिता मदतनिधी जमा करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
बॉलीवूडकरांनी ‘हम है…. उम्मीद-ए-काश्मीर’ या कॉन्सर्टद्वारे पूरग्रस्तांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्याकरिता निधी जमा करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी दुबे आणि समीर कोचर यांनी केले होते. तसेच, यात अदिती राव हैदरी, परिणीती, सुशांत आणि नेहा धुपिया यांनी नृत्य केले. शान, दलेर मेहंदी, अदिती सिंग शर्मा आणि हर्षदीप कौर यांच्या गाण्यांनी तर कार्यक्रमाला अजूनच बहर आला होता. अभिनेता-गायक-दिग्दर्शक फरहान अख्तरनेही त्याच्या ‘रॉक ऑन’ चित्रपटातील गाणी सादर केली.
farhan
‘हम है…. उम्मी-ए-काश्मीर’ हा कार्यक्रम झी च्या ३५ वाहिन्यांवर २६ ऑक्टोबरला दाखविण्यात येणार आहे.