मि.परफेक्शनिस्ट आमीर खान त्याच्या चित्रपट प्रदर्शनावेळी नेहमीच चर्चेत असतो. पण, यावेळेस ट्विटर ट्रेण्डमध्ये आमीर वेगळ्याच कारणामुळे आला आहे. नुकताचं, त्याने इरफान-कंगनाचा ‘कट्टी बट्टी’ चित्रपट पाहिला. त्यानंतर भावूक झालेल्या आमिरला आपले अश्रू अनावर झाले. नेटिझन्सना खिल्ली उडवण्यासाठी अगदी छोटं कारणही पुरेसे असतं. मग त्यानंतर ते काही गप्प बसणार आहेत का? याआधी सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ पाहिल्यावरही तो असाचं भावूक झाला होता. नेटिझन्सचे काही खोडकर ट्विट्स: