महेश भटच्या ‘आशिकी’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनू अग्रवाल ही फार दुर्मीळच सामाजिक कार्यक्रमात दिसते. अलीकडेच तिला मुंबईतील एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स) मध्ये बघितले गेले. एनसीपीएमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये अनू येथील अधिका-यांसोबत दिसली. यावेळी अनूचा चेहरा पूर्वीच्या तुलनेत बराच बदललेला दिसला. तिला ओळखणेही कठीण होते. त्यामुळे हीच का ती आशिकी चित्रपटाती अभिनेत्री अनू असा अनेकांना प्रश्न पडला.
१९९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या अनूने सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर अनेकांची मने जिंकली. मात्र, तिला या यशाचा आनंद फार काळ घेता आला नाही. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनूने चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला. १९९९ साली झालेल्या अपघातामुळे ती जवळजवळ एक महिना कोमामध्ये होती. सध्या अनू मुंगेर, बिहार येथे राहत असून ती हॉलीस्टीक योगाचा सराव करत आहे.