‘कौन बनेगा करोडपती’च्या यशस्वी इनिंगनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘युद्ध’ मालिकेतून पहिल्यांदा छोट्या पडद्यावर नायकाची भूमिका साकारली. परंतु, ‘टीआरपी’च्या आधारस्तंभावर चालणाऱया छोट्या पडद्याच्या व्यवसायात नेमके ‘टीआरपी’ म्हणजे काय रे भाऊ? असा सवाल ‘बिग बीं’च्या मनात निर्माण झाला आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकांच्या ‘टीआरपी’चे खिजगणित काहीच कळत नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.
‘युद्ध’मध्ये अमिताभ मेकअपविना!
ते म्हणाले की, “एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की, त्याने प्रदर्शित झाल्याच्या आठवड्याभरात किती कमाई केली याचे गणित समजून जाते परंतु, टेलिव्हिजन मालिकांचे तसे नाही. मालिकांच्या ‘टीआरपी’चे गणित मला समजतच नाही. मी फक्त माझे काम करत रहातो. ते कसे झाले हे प्रेक्षकच मला सांगू शकतात.” असेही ते म्हणाले.
अमिताभ बच्चन नायकाच्या भूमिकेत असलेला २० भागांची ‘युद्ध’ नावाची मालिका १४ जुलै पासून सोनी वाहिनीवर सुरू आहे. यामध्ये अमिताभ यांच्यासोबत नवाजुद्दिन सिध्दीकी, झकीर हुसैन, सारीका, मोना वासू आणि केके मेनन यांसारखे प्रतिभावंत कलाकार देखील आहेत.