सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. याच दरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर राष्ट्रपती भवनात अमिताभ यांचा अभिनय असलेला ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपट पहात एक निवांत संध्याकाळ व्यतित केली. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात एका भूताची भूमिका साकरली असून, देशाला भ्रष्टाचार आणि अन्य वाईट प्रवृत्तींपासून मुक्त करण्यासाठी हे भूत निवडणूकीत सहभागी होत असल्याचे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मतदानाचे महत्व सांगणारा संदेश देशभर पोहचविण्याचे महत्वपुर्ण कार्यदेखील या चित्रपटाद्वारे करण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्याबरोबर हा चित्रपट राष्ट्रपती भवनात पाहाण्यास संमती देणे हा आपला आणि चित्रपटाशी संबंधीत आपल्याबरोबर असलेल्या सर्वांचा एक दुर्लभ असा सन्मान असल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली.