हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह नऊ जणांना बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्वविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील कोटायन के वेणुगोपाल आणि डी. विरेंद्र हेगडे यांचादेखील पद्वविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते ६० प्रथितयश व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, सुप्रसिद्ध आसामी चित्रपटनिर्माते जाहनू बरूवा आणि संगणक शास्त्रज्ञ   विजय भाटकर यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय, हॉकीपटू साबा अंजूम, महिला क्रिकेटपटू मिथाली राज, अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय आणि संगीतकार रवींद्र जैन यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल येथे झालेल्या या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरूण जेटली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी पद्मविभुषण पुरस्कार स्विकारताना त्यांचा पुत्र अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा उपस्थित होते. पुरस्कार विजेत्यांमध्ये १७ महिलांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नऊ पद्मविभूषण, २० पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री अशा एकूण १०४ पद्म सन्मानांची घोषणा करण्यात आली होती. यंदाच्या पद्म पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी देशांमधील तब्बल १६ परदेशी नागरिकांचाही यापुरस्कारार्थींच्या यादीत समावेश आहे.

पुरस्कार विजेत्यांची नावे –
पद्मविभूषण
1. लालकृष्ण अडवानी, गुजरात
2. अमिताभ बच्चन, महाराष्ट्र
3. प्रकाशसिंग बादल, पंजाबचे मुख्यमंत्री
4. डॉ. डी. वीरेंद्र हेगडे, सामाजिक कार्य, कर्नाटक
5. मोहम्मद युसूफ खान ऊर्फ दिलीप कुमार, महाराष्ट्र
6. जगद्गुरू रामानंदचार्य स्वामी रामभद्राचार्य, उत्तर प्रदेश
7. प्रा. मलुर रामस्वामी श्रीनिवासन, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तमिळनाडू
8. कोट्टयम के. वेणुगोपाल, दिल्ली
9 करीम अल हुसैनी, आगाखान, उद्योग आणि व्यापार, फ्रान्स

पद्मभूषण
1. जाहनू बरुआ, आसाम
2. डॉ. विजय भाटकर, विज्ञान आणि अभियांत्रिकी
3. पत्रकार स्वपन दासगुप्ता, साहित्य
4. स्वामी सत्यमित्रानंद गिरी, उत्तर प्रदेश
5. माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी, प्रशासन, तामिळनाडू
6. घटनातज्ज्ञ डॉ. सुभाष सी. कश्‍यप
7. डॉ. पंडित गोकुळोत्सवजी महाराज, कला, मध्यप्रदेश
8. डॉ. अंबरिश मित्तल, औषधनिर्माण, दिल्ली
9. सुधा रघुनाथन, कला, तमिळनाडू
10. हरीश साळवे, सार्वजनिक व्यवहार
11. डॉ. अशोक सेठ, औषधनिर्माण, दिल्ली
12. पत्रकार रजत शर्मा, साहित्य आणि शिक्षण, दिल्ली
13. सतपाल, क्रीडा, दिल्ली
14. शिवकुमार स्वामी, कर्नाटक
15. डॉ. खरगसिंह वाल्दिया, विज्ञान आणि अभियांत्रिकी, कर्नाटक
16. प्रा. मंजूळ भार्गव, विज्ञान आणि अभियांत्रिकी , अमेरिका
17. डेव्हिड फ्रॉलेय, अमेरिका
18. बिल गेट्‌स, सामाजिक कार्य, अमेरिका
19 मेलिंडा गेट्‌स, सामाजिक कार्य, अमेरिका
20. साईचिरो मिसुमी, जपान

पद्मश्री
1. डॉ. मंजुळा अनागनी, तेलंगण
2. एस. अरुणन, कर्नाटक
3. कन्याकुमार अवसरला, तमिळनाडू
4. डॉ. बेट्टिना शारदा बउमेर, जम्मू काश्मीर
5. नरेश बेदी, दिल्ली
6. अशोक भगत, झारखंड
7. संजय लीला भन्साळी, महाराष्ट्र
8. डॉ. लक्ष्मी नंदन बोरा, आसाम
9. डॉ. ग्यान चतुर्वेदी, मध्य प्रदेश
10. प्रा. योगेश कुमार चावला, चंदिगड
11. जयकुमारी चिक्काला, दिल्ली
12. विवेक देबरॉय, दिल्ली
13. डॉ. सुरंगबाम विमला कुमारी देवी, मणिपूर
14. डॉ. अशोक गुलाटी, दिल्ली
15. डॉ. रणदीप गुलेरिया, दिल्ली
16. डॉ. के. पी. हरिदास, केरळ
17. राहुल जैन, दिल्ली
18. रवींद्र जैन, महाराष्ट्र
19. डॉ. सुनील जोगी, दिल्ली
20. प्रसून जोशी, महाराष्ट्र
21. डॉ. प्रफुल्ल कार, ओडिशा
22. साबा अंजूम, छत्तीसगड
23. उशाकिरण खान, बिहार
24. डॉ. राजेश कोटेचा, राजस्थान
25. प्रा. अलका कृपलानी, दिल्ली
26. डॉ. हरिश कुमार, दिल्ली
27. नारायण पुरषोत्तम मल्या, केरळ
28. लँबर्ट मस्करेनहस, गोवा<br />29. डॉ. जनक पल्टा मॅक्लीगन, मध्य प्रदेश
30. वीरेंद्र राज मेहता, दिल्ली
31. तारक मेहता, गुजरात
32. नील हर्बर्ट न्याँगरीह, मेघालय
33. चेवांग नॉरफेल, जम्मू काश्मीर
34. मोहनदास पै, कर्नाटक
35. डॉ. तेजस पटेल, गुजरात
36. जादव मोलाई पेयाँग, आसाम
37. विमला पोद्दार, उत्तर प्रदेश
38. डॉ. एन. प्रभाकर, दिल्ली
39. डॉ. प्रल्हादा, महाराष्ट्र
40. डॉ. नरेंद्र प्रसाद, बिहार
41. राम बहादूर राय, दिल्ली
42. मिताली राज, तेलंगण
43. पी. व्ही. राजारामन, तमिळनाडू
44. प्रा. जे. एस. राजपूत, उत्तर प्रदेश
45. कोटा श्रीवास्ताव राव, आंध्र प्रदेश
46. प्रा. विमल रॉय, पश्चिम बंगाल
47. शेखर सेन, महाराष्ट्र
48. गुणवंत शहा, गुजरात
49. ब्रह्मदेव शर्मा, दिल्ली
50. मनू शर्मा, उत्तर प्रदेश
51. प्रा. योग राज शर्मा, दिल्ली
52. वसंत शास्त्री, कर्नाटक
53. एस. के. शिवकुमार, कर्नाटक
54. पी. व्हि. सिंधू, तेलंगण
55. सरदार सिंग, हरियाना
56. अरुणिमा सिन्हा, उत्तर प्रदेश
57. महेशराज सोनी, राजस्थान
58. डॉ. निखिल टंडन, दिल्ली
59. एच. तेत्से रिंपोचे, अरुणाचल प्रदेश
60. डॉ. हरगोविंद लक्ष्मीशेखर त्रिवेदी, गुजरात
61. हुआंग बाओशेंग, चीन
62. प्रा. जॅक्स बॅलमोन्ट, फ्रान्स
63. दिवंगत सईद मोहंमद बुरहानुद्दीन, महाराष्ट्र (मरणोत्तर)
64. जीन क्लाउड कॅरीएर, फ्रान्स
65. डॉ. नंदराजन चेट्टी, फ्रान्स
66. जॉर्ज एल. हार्ट, अमेरिका
67. जगतगुरू अमर्त्य सुर्यनंदा महाराजा, पोर्तुगाल
68. दिवंगत मिथा लाल मेहता, राजस्थान (मरणोत्तर)
69. तृप्ती मुखर्जी, अमेरिका
70. डॉ. दत्तात्रेयाडू नोरी, अमेरिका
71. डॉ. रघुराम पिल्लारीशेट्टी, अमेरिका
72. डॉ. सुमित्रा रावत, ब्रिटन
73. प्रा. अॅनेटी शिमिडीचेन, जर्मनी
74. दिवंगत प्राण, दिल्ली (मरणोत्तर)
75. दिवंगत आर. वासुदेवन, तमिळनाडू (मरणोत्तर)