बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन हे महाराष्ट्राच्या फळबागांचे राजदूत होणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस होती. यावर शिक्कामोर्तब झाली असून, त्याची जाहिरात लवकरचं सर्वत्र झळकणार आहे.
नेहमी सूटबूटात पाहावयास मिळणारे बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन हे या जाहिरातींमध्ये मराठमोळ्या लूकमध्ये दिसणार आहेत.  आंबा, चिकू व द्राक्ष आदी फळांचे ब्रॅण्डिंग करताना ते जाहिरातींमध्ये दिसतील. फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच अमिताभ यांना महाराष्ट्राच्ये फळबागांचे ब्रॅण्डींग करण्याचे आवतण दिले होते.  अमिताभ यांनी ट्विटरद्वारे आपण महाराष्ट्राच्या फळबागांचे राजदूत होणार असल्याचे सांगितेल होते. त्यांनी सदर जाहिरांतीची छायाचित्रे ट्विटवर पोस्ट केली आहेत. तसेच, फळ उत्पादनाची जाहिरात केल्याबद्दल आपल्याला आनंद झाल्याचेही त्यांनी व्यक्त केले.