अभिनेत्री असिनने मृत्यूनंतर आपले अवयव आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यांमध्ये ती नेहमीच पुढे राहिली आहे. यापूर्वी तिने रक्तदानही केले होते. अवयवदानाबाबत असिन म्हणाली की, मी आधीपासूनच अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या या निर्णयामुळे लोकांमध्ये जागरुकता निर्माण होईल आणि तेही अशा चांगल्या कार्यात पुढाकार घेतील अशी मला आशा आहे.
आमिरसोबत गजिनी या सुपरहिट चित्रपटाने तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने रेडी, बोल बच्चन, हाउसफुल २, खिलाडी ७८६ हे चित्रपटही केले. आगामी ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात असिन ही अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे.