बॉलीवूडमध्ये मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानसह ‘गजिनी’ चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री असिन लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बॉलीवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असिन ही मायक्रोमॅक्सचा सह-संस्थापक राहुल शर्मा या अरबपतीसह लवकरचं विवाह करणार आहे.
राहुल आणि असिनच्या विवाहात अक्षय कुमारची मध्यस्थी असल्याचे म्हटले जातेय. अक्षय-टिंवकल हे मायक्रोमॅक्सचे पहिले ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत. त्यामुळे अक्षय हा राहुलचा खास मित्र बनलायं. तर दुसरीकडे असिनसोबतही त्याची चांगली मैत्री असल्यामुळे या दोघांच्या लग्नात त्याचा महत्त्वाचा वाटा असल्याचे कळते. गेली काही वर्ष आपल्या लग्नासंबंधी मौन बाळगल्यानंतर असिनने या बातमीला दुजोरा दिला आहे. आगामी ‘ऑल इज वेल’ चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त असलेली असिन म्हणाली की, सध्या मी माझी कामे पूर्ण करत आहे. जेणेकरून, माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी मी वेळ देऊ शकेन. त्यासाठी दोन वर्षांपूर्वीच मी नवीन कामे हातात घेणे बंद केले आहे.
असिनने आमिरसह अजय देवगण, सलमान खान या अभिनेत्यांसह काम केले आहे.