bigg-boss450सोमवारी पार पडलेल्या नामांकनाच्या प्रक्रियेतील अप्रिय घटनांचे ठसे मागे सारत ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य एकमेकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना पुढील कार्यासाठी सामोरे जावे लागते. दरम्यान, घरातील सगळ्यांचा नावडता कर्णधार अलीला ‘बिग बॉस’कडून अधिक शक्ती प्रदान करण्यात येते. त्याला मिळालेली ही शक्ती घरातील सदस्यांसाठी मदतीची अथवा ताणतणावाची ठरू शकत असली, तरी कोणत्याही परिस्थितीत घरातील सदस्यांनी ‘बिग बॉस’च्या आगामी कार्यासाठी तयार राहाणे गरजेचे आहे. यावेळच्या लक्झरी टास्कचे नाव ‘बीबी मिठाईवाले’ असे ठेवण्यात आले आहे. ‘बीबी मिठाईवाले’ टास्क पूर्ण करण्यासाठी डायंण्ड्राची ‘रेड टीम’ आणि गौतमची ‘ब्ल्यू टीम’ अशा दोन संघांत विभागणी करण्यात येते. ‘बिग बॉस’ने दिलेल्या दिवाळी मिठाईच्या ऑर्डरची पुर्तता करताना आपल्यातील पाक कौशल्याची चुणूक दाखवत हे दोन्ही संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. कर्णधार अली क्वालीटी चेक सुपर्वायझरच्या भूमिकेत असून, स्पर्धकांनी तयार केलेल्या पदार्थाची चव चाखून उत्कृष्ट चव असलेल्या पदर्थाची निवड करण्याची जबाबददारी त्याच्यावर सोपविण्यात येते. दोन्ही संघांना पदार्थ बनविण्यासाठीचे साहित्य आणि पाककृती ‘बिग बॉस’कडून पुरविण्यात येते. घरातील कर्णधार अली मिठाईची चव चाखून चांगल्या आणि वाईट मिठाईतला फरक ठरवतो. त्यानंतर, ‘बिग बॉस’कडून जिंकलेल्या टीमला बक्षिस, तर हारलेल्या टीमला शिक्षा देण्यात येते. डायंण्ड्राच्या संघात सोनी, पुनित, उपेन, मिनिषा आणि सुशांत आहेत, तर गौतमच्या संघात परणीत, आर्या, करिश्मा, सोनाली आणि प्रितम यांचा समावेश आहे. टास्क सुरू होताच ताणतणावासदेखिल सुरुवात होते. ‘बिग बॉस’कडून जिलबी आणि काजू कतली मिठाई बनविण्यास सांगण्यात येते. परंतु, संध्याकाळपर्यंत ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांना त्यांच्या आवडीची मिठाई बनविण्यास सांगतो. मिठाई निर्मितीच्या या कार्याने ‘बिग बॉस’च्या घरात दिवाळीचे वातावरण निर्माण होईल का?