bb‘बिग बॉस’च्या घरात शांतता आणि सौख्य नांदेल या आशेवर आणखी एका दिवसाची सुरुवात होते. रेनी, डिंपी पाठोपाठ ‘बिग बॉस’च्या घरात निगार खानचा प्रवेश होतो. ‘बिग बॉस’तर्फे देण्यात आलेल्या ‘सब धुरंदर हॉटेल के अंदर’ या लक्झरी टास्कदरम्यान घरातील सदस्यांपैकी सध्याची कर्णधार डायंन्ड्रा हॉटेलची मालकीण बनते, तर रेनी, डिंपी आणि निगार हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची भूमिका बजावतात आणि घरातील अन्य सदस्य हॉटेलमधील सेवक म्हणून काम पाहतात. पुनित इस्सार घरातील तुरुंगाचा पाहुणचार घेत असल्याने या टास्कमध्ये सहभागी होऊ शकत नाही. या लक्झरी टास्कदरम्यान हॉटेलमधील सेवकांनी केलेल्या सेवेच्या बदल्यात त्यांना हॉटेलमधील पाहुण्यांनी टीप देणे अपेक्षित आहे. सेवकांकडून जास्तीत जास्त काम करून घेणे हे पाहुण्यांचे लक्ष आहे, तर अन्य सेवकांपेक्षा जास्त मोबदला मिळविणे हे सेवकांचे धेय आहे. या लक्झरी टास्कचा हा महत्वाचा भाग आहे. असे असले तरी, ‘बिग बॉस’ने दिलेल्या या कार्यास प्रारंभ होताच पाहुणे आणि सेवकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. परंतु, ‘बिग बॉस’ या गोंधळाच्या परिस्थितीत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणतो. संध्याकाळपर्यंत ‘बिग बॉस’च्या घरात शांतता पसरते. पुढील दिवसाच्या आव्हानांचा विचार करत घरातील सदस्य रात्री झोपी जातात.