बॉलीवूड ‘खान’दानातील आमिर नेहमीच स्वत:ला आणि आपल्या चित्रपटाला चर्चेत ठेवण्यात किंवा त्याबाबतची उत्सुकता वाढविण्यात यशस्वी ठरतो. ‘पीके’ हे त्याचे अगदी ताजे उदाहरण आहे. या चित्रपटासाठी आमिरने दिलेल्या ‘त्या’ खास पोजवरून वादळ उठले होते, बॉलिवूडसह सर्वत्र त्याची चर्चा झाली. आमिर खानच्या आगामी ‘दंगल’ चित्रपटाबाबतही अशीच उत्सुकता निर्माण झाली आहे. जगातील स्ट्राँगगेस्ट मॅन या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ब्रीटनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला आणि जगात ‘स्ट्राँगगेस्ट मॅन’ अशी ओळख असलेला एडी हॉल हा पहिलवान आमिरच्या ‘दंगल’ मध्ये काम करणार आहे. हॉल हा बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ अर्थात ‘बीग बी’ अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहता आहे. ४६२ किलो वजनाच्या एडी हॉल याला बॉलीवूडच्या चित्रपटात पाहणे हा बॉलीवूड आणि प्रेक्षकांसाठीही औत्स्युक्याचा व चर्चेचा विषय झाला आहे.
सहा फूट ३ इंच उंचीच्या या स्ट्राँगेस्ट मॅनला भारतीय आहार विशेषत: आमटी आणि हिंदी चित्रपट विशेष आवडतात. एडी हॉल ‘दंगल’च्या निमित्ताने लवकरच भारत भेटीवर येणार असून त्याला ‘बीग बी’ला ही भेटण्याची उत्सुकता आहे. ‘दंगल’ हा चित्रपट कुस्तीपटूच्याच जीवनावर असल्याचे सांगण्यात येते.
‘दंगल’ चित्रपट जेव्हा कधी प्रदर्शित होईल तेव्हा होईल. पण आपल्या चित्रपटात जगातील गेस्ट मॅनला आणून आमिरने चित्रपटाची अगोदरपासूनच हवा तयार केली आहे.