उंची गाडय़ांचा शौक प्रत्येकालाच असतो. मुंबईमध्ये होणाऱ्या विन्टेज गाडय़ांच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी पाहायला मिळते, तर कित्येक तरुण आपल्या लॅपटॉप किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर ‘ड्रीमकार’चा फोटो मिरविताना दिसतात. महागडय़ा गाडय़ांचे या वेडातून बॉलीवूडचीही सुटका झालेली नाही. अगदी अमिताभ बच्चनपासून ते सलमान, शाहरूख खानपर्यंत प्रत्येकजण त्यांच्याकडील महागडय़ा गाडय़ा मिरविताना दिसतात. नुकतेच आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने विकत घेतलेल्या नव्या कोऱ्या ऑडी गाडीचा फोटो टाकला होता. बॉलीवूडची ही यंग ब्रिगेडिअरसुद्धा गाडय़ांच्या संग्रहाबद्दल मागे नाही. रणबीर कपूर, शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा यांच्यापासून थेट बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या कीर्ती सनोनपर्यंत सर्वचजण आपल्याकडील महागडय़ा गाडय़ा मिरविताना दिसतात. यानिमित्ताने बॉलीवूडच्या नव्या फळीकडील कलाकारांच्या ‘कार’नाम्याची केलेली ही उजळणी.

हम भी कुछ कम नही..
दीपिका पदुकोन, कतरिना कैफ या बॉलीवूडच्या प्रस्थापित अभिनेत्यांकडे अजूनही केवळ एकेकच गाडय़ा आहेत. विशेष म्हणजे दोघींकडेही ऑडी क्यू ७ हीच गाडी आहे. फक्त त्यांचे रंग वेगळे आहेत. कतरिनाला ही गाडी सलमानने भेट दिल्याचे सांगितले जाते आणि सलमानकडून फारकत घेतल्यानंतर तिने ही गाडी विकल्याचीही अफवा आहे. गाडय़ांच्या बाबतीत प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडची सम्राज्ञी आहे, असे म्हटल्यास हरकत नाही. तिच्याकडे मर्सिडीज एस क्लास, पोर्शे या गाडय़ा आहेतच, पण ती रोल्स रॉइल्सचीही मालकीण आहे. विशेष म्हणजे तिला गाडय़ा स्वत:च्या पसंतीनुसार बनवून घ्यायला आवडतात. त्यामुळे तिने रोल्स रॉइल्सवर २ कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च केली होती. श्रद्धा कपूरने नुकतीच मर्सिडीज एमएल ही गाडी
rv02rv03विकत घेतली असून, कीर्ती सनोननेही पहिल्याच चित्रपटामध्ये पुरस्कार मिळाल्याचा आनंद बीएमडब्ल्यू ३ सीरिज विकत घेऊन साजरा केला होता. परिणिती चोप्राकडेही जग्वार्ड एक्सजेएल ही गाडी आहे, तर अनुष्का शर्मा रेंज रोव्हर आणि ऑडीची मालकीण आहे. मध्यंतरी विराट कोहली भारतात परतत असताना विमानतळावर तिची रेंज रोव्हर हजर होती, त्यामुळे त्यांच्यातील अफेअरच्या चर्चेला उधाण आले होते. थोडक्यात या बॉलीवूडची ही नवीन फळीही जुन्याजाणत्या कलाकारांना गाडय़ांच्या संग्रहाबाबत ‘काटों की टक्कर’ देत आहे, असे म्हणायला हरकत नाही.
रणबीर कपूरने बॉलीवूडमध्ये मिळविलेल्या यशाची खात्री त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीइतकीच त्याच्या गाडय़ांच्या यादीवरूनही पटते. रणबीरकडे सफेद रेंज रोव्हर, ऑडी ए८, मर्सिडीज बेंज्झ या गाडय़ा आहेत. rv04याआधी त्याने गाडय़ा ठेवायला जागा नाही म्हणून लाडकी लाल रंगाची ऑडी ए८ विकायलाही काढली होती. अर्थात तेव्हा या गाडीला तिची व्यवस्थित काळजी घेणारा मालक हवा या हट्टामुळे कित्येक दिवस त्याला गाडीसाठी योग्य ग्राहकच मिळत नव्हता. इम्रान खान आणि शाहिद कपूर हे बॉलीवूडमध्ये आपला जम बसविण्यासाठी धडपडत असले, तरी त्यांच्याकडील गाडय़ांचा संग्रह कमी नाही. शाहिदकडे २०१२ रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज ई-क्लास, जग्वार एक्सके-आरएस या गाडय़ा आहेत. मध्यंतरी त्याने वडील पकंज कपूर यांनाही एक महागडी गाडी वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. आमिर खानचा भाचा इम्रान खान याकडे पोर्शे, बीएमडब्ल्यू ३ सीरिज, फेरारी या गाडय़ा आहेत. याशिवाय बायकोच्या प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या इम्रानने तिच्यासाठी खास बिटेल गाडीही घेतली आहे. अर्जुन कपूरकडे सध्या मर्सिडीज एमएल ३५० असून रणवीर सिंगकडे मात्र टोयोटो लॅण्ड क्रूझर प्रादो, मर्सिडीज बेंज्झ ई-क्लास दोन गाडय़ा आहेत.