बॉलिवूड अभिनेत्री अलिया भटचे सामान्य ज्ञान सर्वश्रुत आहे. याबाबतचे अनेक खुसखुशीत संदेश सोशल मीडियावर प्रसिद्ध होताना दिसतात. तर बॉलिवूडच्या या नवतारकेने अलिकडेच एक हजार रुपयांची कमाई केली. बाहेरच्या जगासाठी ग्लॅमरस दुनियेतली तारका असणारी अलिया घरी आपल्या वडीलांची लाडकी परिराणी आहे. प्रसिद्ध चित्रपटकर्ता महेश भट हे अलियाचे वडील. एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या वडीलांना आराम मिळावा, म्हणून त्यांचे पाय दाबून सेवा केली. लहान असताना अलियाला या कामासाठी वडीलांकडून प्रेमाने ५०० रुपये मिळत असत. आता मात्र तिला या कामासाठी १००० रुपये मिळतात. 'शांदार' या शाहीद कपूरबरोबरच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनला गेलेली अलिया नुकतीच भारतात परतली. सध्या बऱ्यापैकी हातात वेळ असल्याने या संधीचा फायदा घेत ती हा वेळ कुटुंबासमवेत मजा करण्यात घालवत आहे. I feel like an old taxi which has clocked to many miles. Massage for my tired feet from Alia is the best gift ever! pic.twitter.com/UeRrloQIuB — Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) September 20, 2014 The best things in life are NOT free! Alia used to get 500 bucks as a child for massaging my foot.Now 1000! pic.twitter.com/ZceUVvGLSN — Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) September 20, 2014