बॉलीवूडचा युवा आणि बहुढंगी अभिनेता राजकुमार राव आपल्या आगामी ‘शिमला मिर्ची’ चित्रपटाबाबत उत्सुक आहे खरा परंतु, त्याच्या उत्सुकतेच्या मागचे कारण आहे चित्रपटात ड्रीम गर्ल हेमामालिनी यांची भूमिका आणि त्याहीपेक्षा या चित्रपटात राजकुमारला हेमा मालिनी यांच्यासोबत रोमान्स सिन्स करायचे असल्याने त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे तो म्हणतो.
तसेच आजवर हेमा मालिनी यांना प्रत्यक्षात भेटण्याची संधी कधीच मिळाली नाही पण, या चित्रपटाच्या माध्यमातून जणू माझे स्वप्नच सत्यात अवतरले आणि बॉलीवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ सोबत मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असेही राजकुमार म्हणाला.
शिमला मिर्ची या रोमॅण्टीक कॉमेडी चित्रपटात हेमामालिनी ‘सिंगल मदर’ची व्यक्तिरेखा साकारत असून, ती आणि तिची मुलगी एकाच तरुणाच्या प्रेमात पडतात असे या कथानकावर चित्रपट आधारलेला असल्याचे सांगितले जात आहे.