बालदोस्तांसाठीचे नितांतसुंदर चित्रपट, बच्चेकंपनीच्या नजरेतून जगातील घटना दाखविणारे उत्तमोत्तम चित्रपट जगभरातील अनेक देशांमध्ये आले आहेत, येत आहेत. आपल्याकडेही बालप्रेक्षकांसाठी हिंदी-मराठी rv14चित्रपट आले आहेत. परंतु आताच्या बच्चेकंपनीची समज, मोबाइल गेम्स, इंटरनेटची उपलब्धता आणि एकूणच त्यांना निदान महानगरांतील मुलांना तरी मनोरंजनाची विविध माध्यमे उपलब्ध असताना बालदोस्तांसाठीच्या चित्रपटांमध्ये मूलभूत बदल होणे अपेक्षित असते. ‘आटली बाटली फुटली’ या मजेदार शीर्षकाव्यतिरिक्त मात्र या मराठी चित्रपटात आजच्या बालदोस्तांच्या मानसिकतेच्या दृष्टीने चित्रपटकर्त्यांनी विचार केलेला दिसत नाही.
शीर्षकावरून बच्चेकंपनीची धमाल चित्रपटात पाहायला मिळेल असे वाटू शकते. लहान मुलांमधली निरागसता, त्यांचा खोडकरपणा दाखविण्यातून काहीतरी गंमत असेल असे शीर्षकावरून वाटले. पण एकामागून एक केवळ दृश्यांची मांडणी चित्रपटात केली असून पटकथेचा अभाव चित्रपट पाहताना वरचेवर जाणवतो.
मुंबईतील प्रेमनगर या वसाहतीत शरयू, जीवन, विराज, आदित्य, ऐश्वर्या, आर्यन अशी एकाच वयाची सहा मुले राहात आहेत. त्यांची एकमेकांशी उत्तमपैकी गट्टी जमलेली आहे. शाळेतही सोबत जाणे-येणे आणि सोसायटीमध्येही एकत्र खेळणे यामुळे या मुलांची एक टीम जमली आहे.  त्यातच त्यांच्याएवढीच असलेली आशा नावाची मुलगी सोसायटीत राहायला येते. मामा-मामीसोबत राहात असताना हुशार असूनही तिला शाळेत न जाता घरकाम करावे लागते. तिला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी बच्चेकंपनीची ही टीम प्रयत्न करते, त्यात यशस्वी होते आणि अचानक एक भयंकर घटना घडते.
लहान मुला-मुलींचे अपहरण करून मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सहा लहानग्यांची टीम करते हा चित्रपटाचा विषय आहे. हा विषय अनेकदा चित्रपटात येऊन गेला आहे. हा विषयही आजच्या संदर्भात मांडताना आणि बच्चेकंपनीकरवी टोळीचा पर्दाफाश करणारे कथानक दाखविताना अनेक नवीन कोनातून विशेषत: आजच्या हुशार बच्चेकंपनीच्या नजरेतून लढविलेल्या शकला दाखविणे प्रेक्षकांना अपेक्षित होते.
याउलट लेखक-दिग्दर्शक आधी बच्चेकंपनीची तद्दन पद्धतीने ओळख करून देतात, नंतर त्यांची थोडीशी मस्ती-मजा दाखवितात, नवीन मुलगी सोसायटीत राहायला येते आणि तिचे मामा-मामी तिचा छळ करतात असे प्रसंग दाखवितात, आशा या मुलीच्या हुशारीची चुणूक दाखविणारा एक प्रसंग टाकतात आणि एकदम भलत्याच संकटाचे प्रसंग दाखवून त्यातून बच्चेकंपनी मोठय़ा माणसांच्या मदतीने टोळीचा पर्दाफाश कसा करतात हे दाखविले आहे.
अतिशय जुनाट पद्धतीच्या चित्रपटाची मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. एकामागून एक सरधोपट पद्धतीच्या प्रसंगांची रांग प्रेक्षकाला दिसते. परंतु यात पटकथा कुठेच नाही. मुलांच्या लकबी, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे वागणे-बोलणे थोडेफार टिपण्याचा प्रयत्न केला असला तरी आजच्या बच्चेकंपनीचे प्रतिबिंब त्यात उमटत नाही.
बच्चेकंपनी चित्रपटात प्रमुख
भूमिकेत असूनही त्यांचे साहस, त्यांनी लढविलेली शक्कल याला वावच दिलेला नाही.
सर्वच बालकलाकारांनी अभिनय चांगला केला आहे आणि शीर्षकगीत श्रवणीय आहे. प्रेक्षकांना कंटाळा न आला तरच नवल अशी प्रसंगांची रचना केली आहे. नावीन्याचा अभाव, पटकथेचा अभाव यामुळे नीरस चित्रपट म्हणूनच या चित्रपटाची गणना करावी लागेल.

आटली बाटली फुटली
निर्माती – सुप्रिया चव्हाण
मूळ संकल्पना, कथा, कार्यकारी निर्माता – विक्रम चव्हाण
दिग्दर्शक – अमोल पाडावे
छायालेखक – अनिकेत के.
सकंलक – हर्षद वैती
संगीतकार – राजेश सावंत
कलावंत – बालकलाकार : शरयू सोनावणे, अनेय पाटील, जीवन करळकर, श्रेयाली वहाणे, विराज राणे, आदित्य कावले, पूर्वा शहा तसेच  स्मिता तळवलकर, संपदा जोगळेकर, शेखर फडके, स्वप्निल जाधव, शिवानी कराडकर, असीत रेडीज, सुनील देव, सचिन देशपांडे, प्रमोद बनसोडे, माधुरी देसाई व अन्य.

aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
Best new web series and movies Web series sequels on OTT Entertainment news amy 95
ओटीटीवर वर्ष सिक्वेलचे!