बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणाने प्रसिद्धीस आलेला आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज ‘हिरो’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सूरजसोबत बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया हीदेखील तिच्या चित्रपट कारकीर्दीचा श्रीगणेशा करत आहे.

‘हिरो’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मनाली येथे सुरु आहे. सलमान खानच्या निर्मितीअंतर्गत हा चित्रपट तयार केला जात आहे. शुटिंगदरम्यान अथिया आणि सूरजचे एक छायाचित्रे कॅमे-यात कैद करण्यात आले. या छायाचित्रात सूरजच्या चेह-यावर रक्ताचे डाग असून अथिया मस्तीभ-या अंदाजात दिसत आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल अडवाणीने हे छायाचित्र ट्विट केले आहे.