आगामी चित्रपट ‘ट्रीप टू भानगढ’चा फर्स्ट लूक चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. चित्रपटाची कथा कॉलेज फ्रेण्ड्सवर आधारित असून रियूनियन पार्टीसाठी ते एकत्र येतात. या मित्रांपैकी एक लेखक होतो आणि तो भांगड यावर कथा लिहण्याचे ठरवतो. इथेच चित्रपटाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. खरोखरचं झपाटलेल्या ठिकाणी चित्रीत केलेला हा बॉलीवूड चित्रपट आहे. झपाटलेल्या ठिकाणांमध्ये भांगड किल्ला असून याकरिता तो जगात तिस-या स्थानावर आहे.
जिंतेद्र पवार दिग्दर्शित ‘ट्रीप टू भानगढ’मध्ये सुझान मुखर्जी, बरून सोब्ती, विक्रम कोचर, मनिष चौधरी, रोहित चौधरी, रचित बहल यांच्या मुख्य भूमिका आहेत.