‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री रिचा चड्डा ‘तमन्चे’मध्ये दिसणार आहे.

चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. रंगीबेरंगी अशा या पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्य कलाकार रिचा आणि निखिल द्विवेदी दिसतात. नवनीत बेहल दिग्दर्शित या चित्रपटाची कथा सुरुवातीला एकमेकांवर विश्वास ठेवू न शकणा-या पण अखेर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या तरुणांवर आहे.