कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस – हल्ला बोल’ या रिअलिटी शोचा विजेता अभिनेता गौतम गुलाटी ठरला. गौतमने करिश्मा तन्ना, प्रितम सिंग या स्पर्धकांना हरवत आठव्या पर्वाचे विजेतेपद पटकाविले. शनिवारी रात्री झालेल्या अंतिम सोहळ्यात फराह खानने विजेत्या गुलाटीला ५० लाख रुपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी दिली.
gautam-gulati-karishma-pritam
गेल्या १३२ दिवसांपासून हा शो सुरु होता. सुरुवातीला या शोचे सूत्रसंचालन दंबग सलमान खानने केले होते. त्यानंतर फराह खानने शेवटच्या काही भागांचे सूत्रसंचालन केले.