भारतीय वंशाच्या ब्रिटीश चित्रपट दिग्दर्शिका गुरिंदर चढ्ढा यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांची भेट घेतल्याचे छायाचित्र चढ्ढा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. मोदींनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल चढ्ढा यांनी मोदींचे आभार देखील मानले. तसेच भारतीय असूनही हिंदी भाषेवर तितकेचे प्रभुत्व नसल्याबद्दल चढ्ढा यांनी मोठ्या मनाने स्वत:हून माफी देखील मागितली.
चढ्ढा या ब्रिटीश चित्रपट आणि रिआलिटी शोच्या नामांकित दिग्दर्शिका असून सध्या ‘देसी रास्कल्स’ या ब्रिटीश एशियन रिआलिटी शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.