रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या रंगभूमीरंगकर्मींसाठी वेगवेगळ्या योजना आहेत.रंगमंच कामगार संघाने एकाउपयुक्त योजनेचा शुभारंभ नुकताच केला. रंगमंच कामगार संघ व सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने‘आरोग्य चिकित्सा शिबीर’नुकतेचं यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आले होते.  या शिबीराचे उद्घाटन अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने दौरे करणाऱ्यारंगकर्मींना तसेच पडद्यामागील काम करणाऱ्या  कामगार मंडळीना धावपळीमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. त्यांच्या या आरोग्याच्या तक्रारी दूर करत त्यांना मदत म्हणून रंगमंच कामगार संघाने चिकित्सा शिबीराचा स्तुत्य उपक्रम पहिल्यांदाच राबवला असून, या योजनेला रंगकर्मींचा चांगला पाठिंबा मिळाला. या योजनेंतर्गत मधुमेह तपासणी, नेत्र चिकित्सा, सवलतीच्या दराने चष्मे वाटप, याचा लाभ कामगारआणिरंगकर्मींनीघेतला.तसेच राजीव गांधी योजनेंतर्गत शस्त्रक्रियेचा २ लाखा पर्यंतचा खर्च या उपक्रमातून उचलला जाणार आहे.
arun-nalawade
रंगमंच कामगार संघांचे अध्यक्ष रत्नकांत जगताप यांनी या योजनेबाबत बोलताना सांगितले की, पहिल्या शिबिराला मिळालेल्या पाठिंब्यानंतर येत्या २५ ऑगस्टला पुन्हा एका शिबिराचे आयोजन करण्याचा मानस आहे. या योजनेचारंगकर्मींना नक्कीच फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाअधिक रंगकर्मींनीघ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.