पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननंतर ‘हमसफर’ मालिकेतील त्याची सहकलाकार महिरा खान ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या बादशहासोबत ती काम करणार आहे.
‘रइस’ चित्रपटाचे निर्माता रितेश सिधवानी यांनी ट्विटरद्वारे महिराची निवड झाल्याचे सांगितले आहे. महिरा ही शाहरुखच्या पत्नीची भूमिका साकारणार असून, तो गँगस्टरच्या भूमिकेत दिसेल. याव्यतिरीक्त नवाजुद्दीन सिद्धीकी हा पोलिसाची भूमिका साकारेल. गेल्याच महिन्यात जिंदगी वाहिनीच्या कार्यक्रमाकरिता महिरा भारतात आली होती. त्यावेळी तिने रइसच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांची भेट घेतली. या चित्रपटाचे चित्रीकरण गुजरातमध्ये होण्याची शक्यता आहे. जर ठरल्याप्रमाणे सर्वकाही व्यवस्थित झाले तर चित्रपटाच्या चित्रीकरणास पुढील वर्षी फेब्रवारीत सुरवात होणार आहे.