‘दी शौकिन्स’ चित्रपटात भूमिका साकारत असलेल्या सुपरस्टार अक्षय कुमारचे दाढी-मिशीवाले रूप आपल्याला खूप भावते असे अभिनेत्री लिझा हेडनचे म्हणणे आहे. ‘दी शौकिन्स’ चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला उपस्थित असलेली लिझा म्हणाली, हा एक स्वच्छ आणि मजेदार चित्रपट असून, चित्रपटात मी अक्षयच्या प्रशंसकाची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष जीवनात आपल्याला दाढी-मिशीवाला अक्षय जास्त भावत असल्याचेही ती म्हणाली. अक्षयनेदेखील लिझाच्या कामाची प्रशंसा केली. आपल्या अभिनय कौशल्याने लिझाने सर्वांना आश्चर्यचकीत केल्याचे तो म्हणाला. चित्रपटात काम करत असलेले अन्नू कपूर, अनुपम खेर आणि पियुष मिश्रा या कलाकारांपैकी कोण सर्वात जास्त ‘शौकिन’ आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना लिझाने अन्नू कपूर हे सर्वात जास्त ‘शौकिन’ असून, पियुष खूप भोळे, तर अनुपम खेर यांचा स्वभाव मैत्रिपूर्ण असल्याचे सांगितले.