अभिनेता कुणाल कपूर आणि अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन सोमवारी लग्नबंधनात अडकले. अतिशय खासगी स्वरुपाचा हा लग्नसोहळा परदेशात पार पडला. नैनाची चुलत बहीण आणि अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाल्याचे समजते. इन्व्हेस्टमेंट बँकर असलेली नैना अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ आणि रमोला यांची कन्या आहे. कुणाल कपूरने ‘मिनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज्’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘आजा नचले’ इत्यादी चित्रपटांमधून अभिनय केला आहे.