गुणवत्तेमुळे भाकीत कठीण बनलेल्या यंदाच्या ऑस्कर पुरस्काराची मोठी विभागणी रविवारी झालेल्या ८६व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सिनेश्रद्धाळूंना पाहायला मिळाली. तांत्रिक आणि दिग्दर्शक गटातील एकूण सात पारितोषिकांवर नाव कोरून ग्रॅव्हिटीने पुरस्कारांमध्ये आघाडी घेतली तरी स्टीव्ह मॅकक्वीन यांच्या गुलामगिरी नाटय़ावरील आधारित ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ या चित्रपटाने सवरेत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. पटकथेचा पुरस्कार ‘हर’ चित्रपटाला, तर अभिनेत्यांचे दोन्ही पुरस्कार डलास बायर्स क्लब या चित्रपटाला मिळाले. ‘ट्वेल्व्ह इयर अ स्लेव्ह’ चित्रपटातील लुपिटा न्याँग यांनी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला असून जॉन रिडले यांनी उत्कृष्ट रूपांतरित कथानाटय़ाचा पुरस्कार पटकावला. कृष्णवर्णीय दिग्दर्शकाच्या चित्रपटास ऑस्कर पुरस्कार मिळण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे.
वर्षभरात सहा हजार ऑस्कर मतदारांनी वेगवेगळ्या चित्रपटांना पसंती दिली. ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे सात ऑस्कर मिळाले असून त्यात तांत्रिक आविष्कार हे सर्वात मोठे कारण होते. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाच्या अल्फान्सो क्वारोन यांच्या पुरस्कारासह  ग्रॅव्हिटीने ध्वनी-संपादन, ध्वनिमिश्रण, दृश्य परिणाम, छायालेखन (सिनेमॅटोग्राफी) हे ऑस्कर पुरस्कारही पटकावले आहेत. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लँचेट हिला वुडी अॅलेन यांच्या ‘ब्लू जस्मिन’ चित्रपटातील लब्धप्रतिष्ठित स्त्रीच्या भूमिकेसाठी मिळाला.
अमेरिकी एफडीआयशी लढा देणाऱ्या एड्स कार्यकर्ता रॉन व्रुडफ यांच्या वास्तव जीवनावर आधारलेले कथानक असणाऱ्या ‘डलास बायर्स क्लब’ या चित्रपटासाठी मॅथ्यू मॅकनॉई आणि जॅराड लेटो अनुक्रमे सवरेत्कृष्ट अभिनेता आणि सहायक अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. मॅथ्यू मॅकॉनई यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
स्पाइक जोन्ज यांना त्यांच्या ‘हर’ चित्रपटासाठी मूळ कथानकासाठी ऑस्कर मिळाले. एक पुरुष व संगणक संचालन प्रणाली यातील ती एक प्रेमकहाणी आहे. ऑस्कर कार्यक्रमात गाण्यांचीही बरसात होती. एलेन डीजेनेरेस यांनी सर्वाना हसवत सूत्रसंचालन केले. परभाषिक चित्रपट गटात इटलीच्या ‘द ग्रेट ब्युटी’ चित्रपटाला ऑस्कर मिळाले. पावलो सोरेंटिनो त्याचे दिग्दर्शक आहेत. डिस्नेचा त्रिमिती चित्रपट ‘फ्रोझन’ला  ‘लेट इट गो’ या मूळ गाण्यासाठी व उत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपटासाठी असे दोन ऑस्कर मिळाले.

ग्रॅ व्हि टी
चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे सात ऑस्कर मिळाले असून त्यात तांत्रिक आविष्कार हे सर्वात मोठे कारण होते. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाच्या अल्फान्सो क्वारोन यांच्या पुरस्कारासह  ग्रॅव्हिटीने ध्वनी-संपादन, ध्वनिमिश्रण, दृश्य परिणाम, छायालेखन (सिनेमॅटोग्राफी) हे ऑस्कर पुरस्कारही पटकावले.

सँडी तूच ग्रॅव्हिटी आहेस, तूच चित्रपटाचा आत्मा आहेस व सहायक आहेस. मला भेटलेल्या चांगल्या व्यक्तींपैकी आहेस. जॉर्ज क्लुनी तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
अल्फान्सो क्वारोन

आपण परमेश्वराचे, आई-वडिलांचे व कुटुंबीयांचे आभार मानतो. माझ्या मते तीन गोष्टी माझ्यासाठी जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे मला प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता. एक दिवस पार पडला की, दुसरा दिवस असा पाठलाग सुरू होता, असे तो म्हणाला.
मॅथ्यू मॅकॉनई

वुडी अॅलनच्या अतिशय वेगळ्या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आले आहे. वुडी तुझे आभार, कारण तू मला ही भूमिका दिलीस. सहकारी कलाकारांनीही चांगल्या भूमिका केल्या आहेत.
केट ब्लँचेट

माझ्या आयुष्यात आज जो आनंद आहे तो दुसऱ्या कुणी तरी भोगलेल्या दु:खामुळे आहे. पॅटसे हिने जी जिद्द दाखवली त्याला व तिने केलेल्या मार्गदर्शनाला सलाम. सोलोमनने तिची व स्वत:ची जी कहाणी सांगितली त्याबद्दल धन्यवाद.
– अभिनेत्री ल्युपिटा एन्योंगो
***
व्हेनेझुएला व युक्रेनमध्ये लढा देणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करताना सांगितले की, युक्रेन, व्हेनेझुएला येथे स्वप्ने पाहणाऱ्यांनो आम्ही येथे आहोत. तुमची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी तुम्ही लढता आहात, अशक्य स्थितीत जगता आहात. आज या रात्री आम्ही तुमचे स्मरण करीत आहोत.
जेराड लॅेटो

हॉलीवूड चित्रपटांनी अमेरिकेच्या गुलामगिरीचा इतिहास कधीच समाजापुढे मांडला नव्हता. प्रत्येकाला जगण्याचा, वाचण्याचा अधिकार आहे हा सोलोमन नॉर्थपचा मोठा वारसा आहे. आपण हा पुरस्कार गुलामगिरीचा समर्थपणे सामना करणाऱ्या लोकांना अर्पण करीत आहोत. आजही २१ दशलक्ष लोक गुलामगिरीचा सामना करीत आहेत
– मॅकक्वीन  

झीरोत दांडी गुल
किमान दहा नामांकने मिळालेल्या ‘अमेरिकन हसल’ चित्रपटाला हात हलवत परतावे लागले. मार्टिन स्कोरसे व लिओनाडरे डिकॅप्रिओ यांच्या पाचही एकत्रित भूमिका असलेल्या ‘द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ या चित्रपटाला अभिनेता व दिग्दर्शकासाठी नामांकन असतानाही एकही ऑस्कर मिळाले नाही. टॉम हँक यांच्या ‘कॅप्टन फिलिप्स’ला एकही ऑस्कर मिळाले नाही.

दिवंगतांना श्रद्धांजली
हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटर व हायलँड सेंटर येथे झालेल्या ऑस्कर सोहळ्यात हॅरॉल्ड रामीस, जेम्स गँडोलफिनी, अलमोर लिओनार्ड, फिलीप सेमोर हॉफमन, पॉल वॉल्टर, जोन फोंटेन, टॉम शेरक व कॅरेन  ब्लॅक, शिरलाय टेम्पल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

८६ व्या ऑस्कर अॅकॅडमी पुरस्कार विजेत्यांची यादी
*उत्कृष्ट चित्रपट – ट्वेल्वह इयर्स स्लेव्ह
* प्रमुख भूमिकेतील उत्कृष्ट अभिनेता – मॅथ्यू मॅकॉनई (डलास बायर्स क्लब)
* उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- ल्युपिटा एन्योंगो (ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह)
*उत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपट- फ्रोझन (ख्रिस बक जेनिफर ली-पीटर डेल वेको)
* उत्कृष्ट छायालेखन (सिनेमॅटोग्राफी)- ग्रॅव्हिटी (इमॅन्युअल ल्युबेझकी)
* उत्कृष्ट वेशभूषा- द ग्रेट गॅटसबे (कॅथिरन मार्टनि)
* उत्कृष्ट दिग्दर्शन- ग्रॅव्हिटी (अलफॅन्सो क्युरॉन)
* उत्कृष्ट माहितीपट डॉक्युमेंटरी-  ट्वेंटी फीट फ्रॉम स्टारडम (मॉरगन नेव्हील, गील फ्रिसन, कॅटिरन रॉजर्स)
* उत्कृष्ट लघुपट – द लेडी इन नंबर 6, म्युझिक सेव्हड माय लाइफ (माल्कम क्लार्क, निकोलस रीड)
* उत्कृष्ट चित्रपट संपादन- ग्रॅव्हिटी  (अल्फान्सो क्वारोन व मार्क सिंगर)
* रंगभूषा व केशभूषा- डलास बायर्स क्लब (अड्रइथा ली, रॉबिन मॅथ्य़ूज)
* उत्कृष्ट मूळ संगीत (स्कोअर )- ग्रॅव्हिटी (स्टीव्हन प्राइस)
* उत्कृष्ट मूळ गीत- लेट इट गो (फ्रोझन)
* उत्कृष्ट निर्मिती रचना- द ग्रेटस गॅटसबे (कॅथरिन मार्टनि व बिव्हरली ड्यून)
* उत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट- मिस्टर हुब्लॉट (लॉरेन्झ विटझ व अलेक्झांडर एसपिगेअर्स)
* उत्कृष्ट अॅक्शन लघुपट- हेलियम (अँडर्स वॉल्टर्स, किम मॅगन्युसन)
* उत्कृष्ट ध्वनिसंपादन- ग्रॅव्हिटी (ग्लेन फ्रीमँटल)
* उत्कृष्ट ध्वनिमिश्रण-  ग्रॅव्हिटी (स्कीप लिवसे, निव अँडिरी, ख्रिस्तोफर बेनस्टेड, ख्रिस मुन्रो)
* उत्कृष्ट कथा अनुयोजन (अडॉप्टेड स्क्रीन प्ले)- ट्वेल्व इयर्स स्लेव्ह
* अॅकॅडमी सन्मान पुरस्कार- अँगेला लॅन्सबरी, स्टीव्ह मार्टनि, पियरो तोसी

* उत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट- द ग्रेट ब्युटी  (इटली)
* जीन हरशॉल्ट मानवतावादी पुरस्कार – अँजेलिना जोली
* उत्कृष्ट मूळ कथा (स्क्रीनप्ले)- हर (स्पाइक जोन्झ)
* उत्कृष्ट दृश्य परिणाम- ग्रॅव्हिटी (टिम वेबर, ख्रिस लॉरेन्स, डेव्ह शिर्क,नील कोरबोल्ड)