madhuri-k1आपल्या सुमधुर हास्याने अनेकांची हृदय जिंकणारी, नयन कटाक्षाने अनेकांना घायाळ करणारी आणि बॉलिवूडमध्ये धक-धक गर्ल म्हणून प्रसिध्द असलेली माधुरी दिक्षित ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या प्रसिध्द शोच्या चित्रीकरणात सहभागी झाली होती. त्याबाबतचे पोस्ट आणि ‘कॉमेडी नाईट…’च्या सेटवरील कपिल शर्माबरोबरचे छायाचित्र तिने टि्वटरवर पोस्ट केले आहे. माधुरीच्या अभिनयाबरोबर तिच्या नृत्याचेदेखील अनेक चहाते आहेत. ‘एक, दो, तीन…’, ‘धक धक करने लगा…’ आणि ‘डोला रे डोला…’सारख्या अनेक गाण्यांवर माधुरीने आपली अप्रतीम नृत्य अदाकारी सादर केली आहे. तिने ‘डान्स विथ माधुरी’ नावाची ऑनलाईन डान्स अॅकॅडमी सुरू केली असून अॅकॅडमीच्या मोबाईल अॅपच्या प्रचारात सध्या ती व्यस्त आहे. याचाच एक भाग म्हणून ती कपिलच्या ‘कॉमेडी नाईट…’ कार्यक्रमात दिसणार आहे. माधुरीने याबाबतचे टि्वट प्रसिध्द केले असून, माधुरी दिक्षितवर चित्रीत करण्यात आलेल्या या भागास तिने विनोद आणि नृत्याचा संगम असे संबोधिले आहे. त्याचप्रमाणे आपण कपिलचा डान्स बघण्यास उत्सुक असल्याचेदेखील म्हटले आहे. माधुरी दिक्षितवर चित्रीत करण्यात आलेला ‘कॉमेडी नाईट…’ चा हा भाग २४ मेरोजी प्रसारीत होणार आहे.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
boisar, palghar lok sabha seat, Uddhav Thackeray responds to pm Modi, duplicate shivsena comment , bjp leader's Education Degree Duplicate, maharashtra politics, lok sabha 2024, election campagin, bjp, shivsena, criticise, Vadhvan Port,
शिवसेनेला नकली म्हणणाऱ्यांची शैक्षणिक पदवी नकली, उद्धव ठाकरे यांचे आरोपाला प्रतिउत्तर
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या