हिंदी चित्रपटसृष्टीतील धुरिणांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन जागतिक सिनेमाही इथे आणायला हवा या विचाराने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा घाट घातला. चित्रपटांच्या निमित्ताने त्यांनी स्वत: जागतिक सिनेमे पाहिले असले तरी महोत्सव भरवायचा म्हणजे काय याचा कुठलाही अनुभव गाठीशी नसताना १९९७ साली त्यांनी ‘मामि’ (मुंबई अकॅ डमी ऑफ मुव्हिंग इमेजेस) महोत्सवाचे बीज रोवले. त्यानंतर या महोत्सवाचे रोपटे वाढत वाढत गेले. आत्तापर्यंत झालेल्या पंधरा महोत्सवांमुळे ‘मामि’ची पाळंमुळं मुंबईत खोलवर रुजली rv10गेली असली तरी गेल्या चार-पाच वर्षांत या महोत्सवाला आर्थिक बांधाबांध करताना अनंत अडचणी येऊ लागल्या. सोळावा ‘मामि’ महोत्सव तर होणार नाही म्हणता म्हणता सिनेप्रेमींनी एकत्र येऊन वाचवला आहे. आणि म्हणूनच यंदाचा ‘मामि’ महोत्सव हा एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे. एक म्हणजे आर्थिक अडचणींमुळे का होईना या महोत्सवाची सूत्रे जी आजवर ‘मामि’च्या संस्थापक सदस्यांच्याच हातात होती ती खऱ्या अर्थाने आत्ताच्या चित्रपटकर्मीकडे आली आहेत. हा जितका व्यवस्थापकीय पातळीवरचा बदल दिसतो त्याहीपेक्षा तो खूप मोठा वैचारिक बदल आहे. आणि यामुळे या महोत्सवाची परिमाणे नक्कीच बदलतील. त्याची झलक निदान या महोत्सवातील चित्रपट आणि कार्यक्रमांचे ज्या पध्दतीने आयोजन केले गेले आहे त्यातून दिसून येते आहे. मात्र, हा बदल किती कायमस्वरूपी असेल यावर या महोत्सवाचे भवितव्य अवलंबून आहे.
 ‘मामि’ महोत्सवाला रिलायन्सचे आर्थिक पाठबळ मिळाले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या महोत्सवाने ग्लॅमरस रुप धारण केले होते. महोत्सवाचा ढाचा कायम राहिला असला तरी त्यात ‘रेड कार्पेट’ सारख्या गोष्टींचे ग्लॅमर चढले होते. एकेक करता करता महोत्सवाच्या आयोजनाचा खर्च हा ५ ते६ कोटींवर येऊन स्थिरावला. मात्र, गेल्यावर्षी अचानकपणे रिलायन्सने महोत्सवापासून फारकत घेतली आणि सगळ्यात मोठी आर्थिक झळ महोत्सवाला बसली. पैशांअभावी महोत्सव करायचा नाही हा निर्णय ‘मामि’चे अध्यक्ष श्याम बेनेगल, विश्वस्त सदस्य अमित खन्ना, महोत्सवाचे संचालक शंकर नाराणयन यांनी घेतलाही होता. एक अखेरचा प्रयत्न म्हणून महोत्सव वाचवण्यासाठी ऑनलाईन आवाहन केले गेले. आणि जे बॉलिवूड या महोत्सवात केवळ मिरवण्यापुरती सहभागी होत होते त्यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत रक्कम गोळा क रायला सुरूवात केली. आत्ताही महोत्सवाच्या खर्चात काटछाट करून हा महोत्सव पार पडतो आहे. पण, या सगळ्या घडामोडींमुळे ‘मामि’चे आत्ताचे विश्वस्त अभिनेता फरहान अख्तर, दिग्दर्शक किरण राव, अनुराग कश्यपसारखी मंडळी खडबडून जागी झाली. आत्तापर्यंत हा महोत्सव इतक्या छान पार पडत होता की महोत्सवासाठी म्हणून तुमच्याकडे ठोस आर्थिक नियोजन असावे लागते, याची जाणीवच झाली नाही. rv08यावर्षीची घटना ही आमच्यासाठी ‘सावध ऐका पुढच्या हाका.. ’अशा स्वरूपाची होती, याची जाहीर कबूली फरहानने दिली. आणि योगायोग म्हणजे हा बदल याआधीच व्हायला हवा होता. उशीराने का होईना तो झाला आहे आणि आत्तापासून हा महोत्सव या पुढच्या पिढीच्या खांद्यावर आहे, असे सांगत अमित खन्नांनी आपला भार थोडा हलका झाल्याचा नि:श्वास सोडला. तब्बल सतरा वर्षांनंतर या महोत्सवाची धुरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सरकली आहे हेच यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ठय़ आहे.
‘मामि’ आणि सामान्य प्रेक्षक
जागतिक सिनेमाचा अनुभव घेत घेत इथेही चांगल्या सिनेमासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, एक चित्रपट संस्कृती निर्माण व्हावी, ही या महोत्सवाचे प्रणेते दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जीची इच्छा होती. मात्र, काळ झपाटय़ाने बदलत गेला तसा महोत्सव वाढत राहिला. पण, चित्रपटसंस्कृती घडली का? याचे ठोस उत्तर देणे कठीण असले तरी महोत्सवाने समाजाच्या मनात बदल केला आहे, अशी भावना अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवनेसारख्या तरुण दिग्दर्शकांनी केली आहे. ‘मामि’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमांमधूनच एकेकाळी आम्हाला जागतिक सिनेमाची ओळख झाली. महोत्सवाचे ओळखपत्र गळ्यात लटकवून प्रत्येक सिनेमासाठी गर्दी करणारे, सिनेमा संपल्यानंतर त्याच कट्टयावर घडणारी साधक-बाधक चर्चा अनुभवायची आणि पुन्हा कॅटलॉगवर नजर फिरवत आपल्याला हव्या असणाऱ्या ‘सिनेमा’साठी वाट पहायची हा अनुभव जवळपास प्रत्येक दिग्दर्शकाने घेतला आहे. आत्ता दिग्दर्शक म्हणून महोत्सवाच्या व्यासपीठावर असले तरी धडपडीच्या काळात चांगल्या सिनेमाची गाठ घालून देण्यासाठी आपल्याकडे आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मत विक्रमादित्य मोटवने यांनी व्यक्त केले आहे. अगदी सर्वसामान्य प्रेक्षकोंचाच विचार करायचा झाला तर सध्या वेगवेगळ्या शैलीतले, आशयविषयांचे चित्रपट यश मिळवत आहेत आणि त्याचे कारण प्रेक्षकांनी त्यांना आपलेसे केले आहे.rv09