‘युनिव्हर्सल मराठी’ आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य कला संचलनालय यांच्या संयुक्त विद्दमाने आयोजित ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सव मुंबईच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे नुकताच पार पडला. या महोत्सवात  ‘सामाजिक जनजागृती’ या प्रवर्गामध्ये ‘उडी’ या लघुपटाने बाजी मारली तर आंतरराष्ट्रीय प्रवर्गात ‘मेळावा’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर  अनिमेशन या विभागात ‘अमलू’, जाहिरातपट  या प्रवर्गात ‘ज्ञानयज्ञ’ व मोबाईल शूट फिल्म या विभागात ‘माय  लाईफ इन मुंबई’ हे लघुपट सर्वोत्कृष्ट ठरले.  
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, तसेच पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटन शारदाश्रम अनिमेशन स्कूलचे डीन  व्हि. जे. सामंत यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण समारंभ निर्माते शंतनू रोडे यांच्या हस्ते पार पडला.  अध्यक्षस्थानी युनिव्हर्सल मराठी चे अध्यक्ष अजित जाधव होते. राष्ट्रीय पातळीवरील या महोत्सवात जगभरातून तब्बल ४८३ लाघुपाटानी सहभाग घेतला होता. त्यापकी निवडक ७० लघुपट महोत्सवात दाखविण्यात आले. अंतिम फेरीसाठी कुंद प्रमिला नीलकंठ, दत्ता जमखंडे, महेश घाटपांडे, अमित मलिक व चेतन माथुर यांनी काम पाहिले. लघुपटकारांच्या सततच्या मागणीमुळे युनिव्हर्सल मराठी जानेवारी २०१५ पासून ‘शॉर्टफिल्म वर्कशॉप’ सुरु करत आहे, असे युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी यावेळी जाहीर केले.