राजश्री प्रोडक्शनचा आगामी चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो‘ हा पुढील वर्षात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर नील नितीन मुकेश काम करणार आहे. हा आपल्या करीअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे, असं नील म्हणतो. या चित्रपटात सलमानबरोबर काम करायचं असल्याने ते एक मोठं आव्हान आहे असं नीलला वाटतं. त्याच्याबरोबर चांगलं काम करण्यासाठी नील आतापासूनच तयारीला लागला आहे. या चित्रपटात सलमानच्या भावाच्या भूमिकेत दिसेल. नील एका तमिळ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणार आहे.