सलमान खान जसा आपल्या ‘दबंग’ इमेजसाठी प्रसिद्ध आहे, तशाच त्याच्या दानशूरपणाच्या अनेक कथा बॉलीवूडमध्ये ऐकवल्या जातात. यंदा ईदच्या मुहूर्तावर सलमानने हदयाची व्याधी असणाऱ्या १०० मुलांना मदत करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ‘बिंग ह्युमन’ या चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून सलमान खान या १०० मुलांच्या उपचाराचा खर्च उचलणार आहे. ज्या मुलांना पैशाअभावी हदयरोगावरील उपचार घेणे शक्य नसेल, अशा १०० मुलांना ‘बिंग ह्युमन’ संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात येणार असल्याचे सलमानने ट्विटरवर जाहीर केले आहे. मात्र, निव्वळ पैशासाठी कोणीही या मदतीचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा, अशी तंबी द्यायलाही सलमान विसरलेला नाही.