अक्षय कुमार याची भूमिका असलेल्या ‘बेबी’ या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. भारतीय गुप्तहेर मोहिमेत एका अतिरेक्याला पकडतात असे या चित्रपटात दाखवले असून आता हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करू देणार नाही, असे तेथील चित्रपट प्रमाणन मंडळाने जाहीर केले आहे.
‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, प्रमाणन मंडळाने इस्लामाबाद व कराची येथे या चित्रपटावर बंदी घातली आहे, कारण त्यात मुस्लिमांची प्रतिमा नकारात्मक केली आहे व या चित्रपटातील नकारात्मक पात्रे ही मुस्लीम नावाची आहेत. सर्व सीडी व डीव्हीडी इस्लामाबादमध्ये ताब्यात घेण्यात आल्या.  हा चित्रपट २३ जानेवारीला कराचीत प्रदर्शित होणार होता. ‘बेबी चित्रपटाचे’ दिग्दर्शक नीरय पांडे यांनी सांगितले की, हा चित्रपट पाकिस्तान विरोधी नाही. ‘एक था टायगर’ या चित्रपटावरही यापूर्वी पाकिस्तानने बंदी घातली होती.