पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेतील उपहारगृहात काही खासदारांसोबत दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. उपहारगृह असलेल्या संसदेतील दुसऱ्या मजल्यावरील ७० क्रमांकाच्या खोलीत आज दुपारी नरेंद्र मोदी अचानकपणे अवतरले. त्यानंतर त्यांनी उपहारगृहात शाकाहारी थाळी मागविली. मोठ्या प्रमाणात अनुदान असलेल्या या उपहारगृहात खासदारांची नेहमी वर्दळ असते. मात्र, सोमवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे या ठिकाणच्या जेवणाचा अनुभव वेगळाच ठरला. जेवण घेतल्यानंतर पंतप्रधानांनी उपहारगृहाच्या आगंतुक रजिस्टरमध्ये ‘अन्नदाता सुखी भव:’ असा संदेशही नोंदविला.
संसदेतील हे उपहारगृह  भारतातील सर्वात स्वस्त उपहारगृह आहे. संसेदच्या कामकाजानिमित्त आलेले खासदार, अधिकारी व पत्रकार नेहमी या उपहारगृहात जेवणाचा आस्वाद घेतात. या उपहारगृहात सर्वांत महागडा पदार्थ चिकन बिर्याणी आहे. या बिर्याणीची किंमत ३४ रुपये आहे.