टेलिव्हिजनवरील बहुचर्चित रिआलिटी कार्यक्रम ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खान आणि तिचा पती इस्माइल खान यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सना आणि इस्माइलने मंगळवारी रात्री आपल्याला मारहाण केल्याचा आरोप दिग्दर्शक ओम प्रकाश यांची भाची पूनम खन्ना हिने केला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांना देण्यात आल्याचे समजते. यानुसार अंधेरी पोलिसांनी सना आणि तिच्या पतीला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सना आणि तिच्या पतीकडून आपल्याला धमकावले जात असल्याचाही आरोप पूनम खन्नाने केला आहे. पूनमने सना आणि इस्माईलच्या लग्नाची माहिती माध्यमांना दिल्याचे या दोघांना न आवडल्याने त्यांनी पूनमला समजते. त्याचप्रमाणे इस्माइल याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप देखील पूनमने केला आहे.